AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : 200 टक्के भारत जिंकणार, पण ट्रम्प यांच्या छोट्या मेंदूमुळे अमेरिकेचं डॅमेज खूप मोठं असेल, कसं ते समजून घ्या…

Explained : ट्रम्प यांची सोच खूप छोटी आहे, हे ते वारंवार आपल्या निर्णयातून दाखवून देत असतात. टॅरिफच्या बाबतीतही त्यांनी तेच केलय. आज भारतासमोर चॅलेंजिंग स्थिती आहे, नुकसान होत आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच होणार नुकसान डबल, टिबल असेल. कसं ते समजून घ्या.

Explained : 200 टक्के भारत जिंकणार, पण ट्रम्प यांच्या छोट्या मेंदूमुळे अमेरिकेचं डॅमेज खूप मोठं असेल, कसं ते समजून घ्या...
Pm modi-Donald Trump
| Updated on: Sep 05, 2025 | 1:37 PM
Share

भारत सरकारने नुकताच सर्वसामान्यांना जीएसटीमध्ये दिलासा दिला. सरकारने अनेक उत्पादनांवरील जीएसटी संपवला. अनेक उत्पादनांवरील जीएसटी कमी केला. याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. भारत सरकार आता ट्रम्प यांच्या टॅरिफशी झुंजणाऱ्या निर्यातकांसाठी काम करत आहे. निर्यातकांना दिलासा देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरु आहे. लवकरच ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या निर्यातदारांच्या मदतीसाठी काही योजनांची घोषणा होऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफची घोषणा केल्यानंतर कपडे, दागिने आणि आभूषण क्षेत्रातील निर्यातदारांना आव्हानाचा सामना करावा लागतोय. चामडा, चप्पल, कृषी, रसायन, इंजिनिअरींग उत्पादने तसच समुद्री निर्यात सेक्टरशी संबंधित निर्यातदारांसमोर नवीन आव्हान निर्माण झाली आहेत. त्यामुळेच निर्यातदार चिंतेत आहेत.

एकाएकी हे सर्व थांबलं

अमेरिकन बाजारपेठेचे दरवाजे बंद झाल्यामुळे भारतीय निर्यातदारांना तातडीने नव्या बाजारपेठेची आवश्यकता आहे. याच बाजारपेठेचा शोध घेतला जात आहे. तसच या क्षेत्रातील नोकऱ्या सुरक्षित रहाव्यात हा सुद्धा प्रयत्न आहे. भारत व्यापारात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. भारतातून मोठ्या प्रमाणात अमेरिकेला साहित्याची निर्यात व्हायची आहे. आता 50 टक्के टॅरिफमुळे एकाएकी हे सर्व थांबलं आहे.

भारत सरकार काय उपायोजना करतय?

सरकार आता तशाच प्रोत्साहन पॅकेजवर काम करतय जे त्यांनी कोविड काळात MSME सेक्टरला दिलं होतं. सोबत सरकार एक्सपोर्ट प्रमोशन मिशनवर काम करत आहे. ज्याची घोषणा बजेटमध्ये केली होती. कोणाच्याही दबावासमोर झुकणार नाही, हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केलय. काही दिवसांपूर्वी मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं की, आम्ही निर्यातकांसाठी काही उपायोजना करणार आहोत. सर्व निर्यातदारांना नवीन बाजार शोधण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. ट्रम्प यांच्या टॅरिफ संकटाचा सामना करण्यासाठी सरकार लवकरच नवीन निर्णयांची घोषणा करु शकते.

‘भारताची यावर्षी निर्यात जास्त होईल’

काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री पीयूष गोयल यांनी भारताकडून सुरु असलेल्या उपायोजनांची माहिती दिली. अमेरिकेला पर्याय ठरु शकणाऱ्या अन्य बाजारपेठांचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. पुढच्या काही दिवसात नवीन करार होतील. अनेक देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड करार केला आहे. त्याचा फायदा निर्यातीमध्ये होईल. अमेरिकेच्या टॅरिफ संकटानंतरही भारताची यावर्षी निर्यात जास्त होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

अमेरिका 200 टक्के हरणार, कसं?

आज ट्रम्प यांनी भारतासमोर चॅलेंजिंग स्थिती निर्माण केलीय. भारताला अडचणीत आणणार डाव खेळला आहे. पण भारतीय उद्योजक हुशार आहेत. ते आपल्यासाठी दुसरी बाजारपेठ शोधून काढतीलच. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा अल्पकाळासाठी फटका बसेल. पण उद्या भारत या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेकडे चीनला सामना करण्यासाठी विश्वासू मित्र नसेल. ट्रम्प यांच्या अल्प, छोट्या मेंदूचा अमेरिकेला बसणारा फटका दीर्घकालिन असेल. अमेरिकेच्या जागतिक महासत्तापदाला उद्या चीनकडून आव्हान मिळणार आहे. अशावेळी भारत अमेरिकेसोबत हवा. कारण चीनला रोखण्याची क्षमता भारतात आहे. म्हणून ट्रम्प यांच्याआधीच्या सर्व अध्यक्षांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवले, भारताला बळकट केलं. पण ट्रम्प यांचं वागण याउलट आहे. त्यांची छोटी सोच आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.