AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणला ट्रम्प यांचा शेवटचा इशारा, 5 प्लान तयार, विचार करा, अन्यथा मागे काहीच शिल्लक राहणार नाही…

अमेरिकेने इराणच्या विरोधात संभाव्य अंतिम प्रहारासाठी पर्यायांची तयारी केली आहे. यात महत्वाच्या बेटांवर कब्जा करण्यापासून तेल मार्गांची नाकाबंदीचा समावेश आहे. यात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आणि जमीनी कारवाईचाही समावेश आहे. यासाठी सैन्य तैनात केले जात आहे.

इराणला ट्रम्प यांचा शेवटचा इशारा, 5 प्लान तयार, विचार करा, अन्यथा मागे काहीच शिल्लक राहणार नाही...
donald trump
| Updated on: Mar 26, 2026 | 9:53 PM
Share

इराणला सिजफायरच्या बोलण्यात अडकवून अमेरिका आता इराणवर निर्णायक आणि अखेरचा मोठा प्रहार करण्याची योजना आखत आहे. पेंटागनाचा प्रयत्न निर्णायक प्रहार करुन हे युद्ध संपवण्याचा आहे. यासाठी आता अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ सक्रीय झाले आहेत. हे युद्ध दीर्घकाल लांबू नये यासाठी हा प्लान रचला जात आहे. वास्तविक इराण युद्ध लवकर समाप्त करण्यास अपयशी ठरल्याने अमेरिका बॅकफूटवर गेला आहे. एकीकडे अमेरिकेसह संपूर्ण जगात आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. तर दुसरीकडे इराणमध्ये सत्ता बदल न झाल्याने अमेरिकेचा प्लान उद्धवस्थ होताना दिसत आहे.

अमेरिका मीडिया आऊटलेट एक्सियोसच्या माहितीनुसार सिजफायर संदर्भात इराणने होकार दिला नाही तर अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत इराणची महत्वाची बंदरे ( उदा. खर्ग, अबू मूसा ) यांच्यावर कब्जा करणे, तेल मार्गांची घेराबंदी करणे वा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले आणि शक्यतो जमीनीवरील लढाईला सुरुवात करणे यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांचे अंतिम प्रहाराचे पर्याय –

1. खार्ग बेटांवर (इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र)  कब्जा करणे वा त्याची घेराबंदी करणे. येथून इराणचा ९० टक्के तेल पुरवठा केला जातो.

2. लारक बेटावर (होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रणासाठी महत्वाचे )  हल्ला करणे किंवा कब्जा करणे, जगातील २० टक्के तेल पुरवठा येथून होतो.

3. अबू मूसा + आसपासच्या बेटांवर (होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्वाचे प्रवेश द्वार) वर कब्जा करणे. यावर नियंत्रण करुन होर्मुझच्या भागातील इराणचे वर्चस्व नष्ट होईल.

4. या क्षेत्रातील इराणी इंधन टाक्यांना रोखणे वा त्यांच्यावर कब्जा करणे आणि आण्विक – ऊर्जा स्थळांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करणे.

5. आण्विक सामुग्रीला सुरक्षित करण्यासाठी इराणच्या आत जमीनी सैनिक कारवाई करणे, यासाठी अमेरिकेने १००० मरीन्सचे जवान मध्य पूर्वेत पाठवले आहेत.

ट्रम्पचा इराणला निर्वाणीचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रुथवर एक पोस्ट लिहून इराणला वाटाघाटी चर्चेतून काढता पाय न घेण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी लिहिलेय की इराणचे अधिकारी एकीकडे आमच्याकडे चर्चेसाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी भिक मागत आहेत. दुसरीकडे पब्लिकमध्ये हे सांगत आहेत की आम्ही अभ्यास करतोय. प्रस्तावातून पळणे इराणसाठी फायद्याचे नाही.

ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की जर चर्चेतून युद्धविराम झाला नाही तर मागे वळून पाहण्यासाठी मागे काहीच उरणार नाही. इराण एवढी मोठी चूक कशी काय करु शकतो ?

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?