अमेरिकेवर मोठं संकट, उडाला हाहाकार, अख्ख मार्केट जाम

अमेरिकेमधून मोठी बातमी समोर येत आहे, सध्या अमेरिका आता एका नव्या संकटाचा सामना करत असून, अमेरिकेची संपूर्ण बाजरपेठ ठप्प झाली आहे, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे.

अमेरिकेवर मोठं संकट, उडाला हाहाकार, अख्ख मार्केट जाम
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 28, 2025 | 8:45 PM

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना आता मोठ्या संकटात टाकलं आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर लावलेला भरमसाठ टॅरिफ हे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे इतर देशांमधून अमेरिकेत होणारी निर्यात प्रचंड प्रमाणत कमी झाली आहे, त्यामुळे वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेमध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, अनेक कंपन्यांकडे स्टॉकच शिल्लक नाहीये. दरम्यान मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे अमेरिकेत महागाई देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याचा मोठा फटका हा तेथील व्यापाऱ्यांना बसत आहे, अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकेमध्ये वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठा उत्साह असतो, या काळात सुट्ट्या देखील असतात. सुट्ट्या आणि नाताळचं सेलीब्रेशन यामुळे वस्तुंच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, वेगवेगळ्या कलरचे इलेक्ट्रिक लॅम्प आणि इतर वस्तू चीनमधून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात, मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की, चीनवर अमेरिकेनं शंभर टक्के टॅरिफ लावला आहे, त्यामुळे चीनमधून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, परिणामी सध्या अमेरिकेच्या बाजारपेठेत अनेक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं ब्राझीलवर देखील मोठा टॅरिफ लावला आहे, त्यामुळे या देशातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं महागाई वाढली आहे. सध्या अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांकडे वस्तुंचा पुरेसा स्टॉकच उपलब्ध नाहीये, ज्या कंपन्या आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांचं अमेरिकेच्या या धोरणामुळे मोठं नुकसान होत आहे.

दरम्यान टॅरिफचा परिणाम हा अमेरिकेवर होत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे आपलं टॅरिफ संदर्भातील धोरणं वारंवार बदलताना दिसत आहेत, काही दिवसांपूर्वीच त्यांनी काही कृषी मालावरील टॅरिफमध्ये कपात केली होती. तर दुसरीकडे अमेरिकेत महागाई प्रचंड वाढल्यामुळे आता तेथील लोकांच्या मनात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकप्रकारचा रोष निर्माण होताना दिसत आहे. टॅरिफमुळे छोटे व्यापारी आणि सामान्य लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक जीवनावश्यक वस्तु देखील प्रचंड महाग झाल्या आहेत.