झटपट श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ अब्जाधीशाला आयडिया द्या; 730 कोटी रुपये मिळवा!

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविलेले अब्जाधीस एलन मस्क सध्या ट्विटरवरून लोकांना नवनवीन आयडिया देण्याचं आवाहन करत आहेत. (Elon Musk Announces $100 Million Prize To Develop This Technology)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:34 PM, 22 Jan 2021
झटपट श्रीमंत व्हायचंय?, 'या' अब्जाधीशाला आयडिया द्या; 730 कोटी रुपये मिळवा!

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविलेले अब्जाधीस एलन मस्क सध्या ट्विटरवरून लोकांना नवनवीन आयडिया देण्याचं आवाहन करत आहेत. एका टेकनिक संदर्भात ते लोकांना अफलातून आयडिया देण्याचं आवाहन करत आहेत. इतकेच नव्हे तर आयडिया देणाऱ्यांना कोट्यवधीचं बक्षीस देण्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्हालाही झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर आताच मस्क यांच्या ट्विटर अकाऊंटवर जा आणि त्यांना भन्नाट आणि एक नंबर आयडिया देऊन करोडपती व्हा. (Elon Musk Announces $100 Million Prize To Develop This Technology)

टेस्लाचे सीईओ एलन मास्क सध्या दोन कारणांनी चर्चेत आहेत. एक म्हणजे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं आहे. तर दुसरं म्हणजे ते भारतात ई-व्हेईकल लाँच करणार आहेत. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाला कॅप्चर करणारं सर्वोत्तम तंत्र शोधून काढणाऱ्या व्यक्तीचा एलन मस्क शोध घेत आहेत. मस्क यांनी स्वत: ट्विट करून तशी माहिती दिली आहे. जी व्यक्ती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कॅप्चर करणारं सर्वोत्तम तंत्र शोधून काढणाऱ्याला 730 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अशी वाढली संपत्ती

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून या महिन्यात मस्क यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या मते जानेवारी 2020मध्ये श्रीमंतांच्या यादीत मस्क 35 व्या स्थानी होते. 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांची संपत्ती 27.6 अब्ज डॉलर होती. तिमाहीनंतर म्हणजे 1 एप्रिल 2020मध्ये त्यांची संपत्ती 29 अब्ज डॉलर झाली. दुसऱ्या तिमाहीत म्हणजे 1 जुलै 2020मध्ये हा आकडा 57 अब्ज डॉलर झाला. तर तिसऱ्या तिमाहीत म्हणजे 1 ऑक्टोबर 2020मध्ये त्यांची एकूण संपत्ती 108 अब्ज डॉलर झाली. (Elon Musk Announces $100 Million Prize To Develop This Technology)

 

संबंधित बातम्या:

शास्त्रज्ञांच्या हाती लागले डायनासोरचे अवशेष, पृथ्वीवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जीव असल्याचा दावा

68 वर्षीय व्लादिमीर पुतीन यांची 37 वर्षाची गर्लफ्रेन्ड! पुतीन यांच्या शत्रूचा दावा

ड्रॅगनचा पलटवार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 27 जणांवर बंदी, चीनविरोधी धोरणाचा ठपका

(Elon Musk Announces $100 Million Prize To Develop This Technology)