68 वर्षीय व्लादिमीर पुतीन यांची 37 वर्षाची गर्लफ्रेन्ड! पुतीन यांच्या शत्रूचा दावा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात मोठे शत्रू असणारे एलेक्सी नावलनी हे रशियात परतले असून त्यांनी पुन्हा एकदा पुतीन यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:29 PM, 21 Jan 2021
68 वर्षीय व्लादिमीर पुतीन यांची 37 वर्षाची गर्लफ्रेन्ड! पुतीन यांच्या शत्रूचा दावा

मुंबई : रशियामध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात मोठे शत्रू असणारे एलेक्सी नावलनी हे रशियात परतले असून त्यांनी पुन्हा एकदा पुतीन यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. नावलनी यांच्या नुकताच विषप्रयोग करण्यात आला आहे. त्यातून ते थोडक्याच वाचले आहेत. नावलनी हे पुन्हा रशियात परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नावलनी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुतीन यांच्याबद्दल अनेक गोप्यस्फोट केले आहेत. त्यात महिलांबाबतच्या संबंधाचाही उल्लेख आहे.(Alexei Navalny’s information about Vladimir Putin’s 37-year-old girlfriend)

पुतीन हे आपल्या कथिल गर्लफ्रेन्डवर सरकारी तिजोरी रिकामी करत असल्याचा गंभीर आरोप नावलनी यांनी केलाय. इतकच नाही तर पुतीन हे आपली आधीची पत्नी आणि मुलीवरही मोठ्या प्रमाणात दौलतजादा करत असल्याचंही नावलनी यांनी म्हटलंय. पुतीन यांनी 100 अब्ज रुपयांचं घर बनवलं असून, ते काला सागर किनाऱ्यालगत आहे. या अलिशान घरात असंख्य सुख-सुविधा असल्याचंही नावलीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

कोण आहे पुतीन यांची गर्लफ्रेन्ड?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं अफेयर माजी ऑलिंपिक चॅम्पियन एलिना कबाएवा हिच्यासोबत असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. 37 वर्षीय एलिना हिने 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅशियममध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. तत्पूर्ण 2000 मध्ये तीन कास्य पदकाची कमाई केली होती. 1983 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये जन्माला आलेल्या एलिनाचं नाव सुरुवातीला 2008 मध्ये पुतीन यांच्याशी जोण्यात आलं होतं. 2013 मध्ये पुतीन यांनी पत्नीशी काडीमोड घेतला आहे. त्यानंतर पुतीन यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. 2016 मध्ये कबाएवा लग्नाच्या अंगठीसह दिसून आली होती.

गर्लफ्रेन्डकडून पुतीन यांना जुळं

2017 मध्ये एलिना गर्भवती असल्याचं बोललं जात होतं. एलिना ही जुळ्या बाळांची आई झाल्याचा दावाही करण्यात येत होता. आता नावलनी यांनी दावा केला आहे की, पुतीन हे सरकारकी तिजोरीतून आपल्या गर्लफ्रेन्डवर मोठा पैसा खर्च करत आहेत. या पैशांवर रशियाच्या गरीब जनतेचा अधिकार आहे. इतकच नाही तर पुतीन यांनी सरकारी पैशातून एलिनाच्या आजीला सेंट पीटर्सबर्गमध्ये एक घर घेऊन दिलं आहे. एलिनाला वार्षिक पगार 75 कोटी रुपये आहे आणि ती माध्यमांवर आलं नियंत्रण ठेवत असल्याचा आरोपही नावलीन यांनी केलाय.

मोलकरणीकडेही कोट्यवधीची संपत्ती

क्रिवोनोगिख नावाच्या एका मोलकरणीसोबतही पुतीन यांचे संबंध होते. ती पुतीन यांच्या मुलांची आई आहे. ती एक सुंदर तरुण मुलगी होती. आता ती अचानकपणे गर्भश्रीमंत झाल्याचं नावलीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. इतकच नाही तर त्या मोलकरणीकडे 118 फुटाची यॉच असल्याचंही नावलीन यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

Alexei Navalny’s information about Vladimir Putin’s 37-year-old girlfriend