रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?

जागतिक संकटाच्या काळातही रशियाने जे साध्य केलंय ते त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेलाही शक्य झालेलं नाही.

रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 5:27 PM

मॉस्को : संपूर्ण जगात 2020 वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करता करताच संपलं. या काळात अनेक मोठमोठ्या अर्थव्‍यवस्‍था संकटात सापडल्या. मात्र, रशिया यात काहीसा वेगळा ठरल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे या जागतिक संकटाच्या काळातही रशियाने जे साध्य केलंय ते त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेलाही शक्य झालेलं नाही (Russias gold reserves above US dollars for the first time ever despite pandemic).

पहिल्यांदाच2020 मध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रशियाकडील सोन्याचा साठा रेकॉर्ड स्‍तरावर वाढलाय. सध्या रशियाकडे जवळपास 583 बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा आहे. पुतिन मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी मोहिम राबवत होते. याच मोहिमेला आत्ता यश येत असल्याचं दिसतंय.

रशियाने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी का केली?

रशियाच्या सेंट्रल बँकेने नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यानुसार जून 2020 पर्यंत रशियाकडील सोन्याचा साठा 23 टक्क्यांपर्यंत वाढलेला होता. जून 2020 पर्यंत रशियाकडे 128.5 बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा होता. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आता रशियाकडे जगातील एकूण सोन्याचा जवळपास 22.9 टक्के भाग आहे. मॉस्‍को टाईम्‍सने दिलेल्या माहितीनुसार मागील 3 वर्षांमध्ये रशियाने आपल्या परदेशी चलनाच्या भंडारात डॉलरच्या जागेवर सोने आणि इतर चलनांना जागा दिलीय. यात चीनच्या युआन या चलनाचाही समावेश आहे. यामागे रशियाचं अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करणं हा आहे.

व्‍लादीमिर पुतिन यांनी रशियाच्या अर्थव्‍यवस्‍थेला डॉलरच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी एक मोहिमच सुरु केली होती. याचा उद्देश अमेरिकेसोबत संबंध बिघडल्यास लादल्या जाणाऱ्या निर्बंधांपासून रशियाला वाचवणे हा होता. 2014-2016 दरम्यान रशियाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी रशियाने आपल्या तेल उद्योगात झालेल्या नफ्याची गुंतवणूक परदेशी चलनात केली होती.

कोणताही देश सोनं का खरेदी करतो?

जगात जेव्हा युद्ध सुरु होतं तेव्हा कोणत्याही देशाच्या चलनाला काहीही मूल्य राहत नाही. अशा स्थितीत सोनं देऊनच शस्त्रास्त्र आणि इतर गोष्टींचा व्यवहार होतो. त्यामुळेच सोन्याची गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडे एकूण 8,133.5 टन सोनं आहे. जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे अधिकृतपणे 3,369.70 टन सोने आहे.

हेही वाचा :

Special Story : यंदा राज्यात सोनं ‘भाव’ खाणार का? वाचा सध्याचा ट्रेंड

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोनं किती टक्के शुद्ध? ‘या’ अ‍ॅपवर कळणार माहिती, तक्रार करण्याचीदेखील व्यवस्था

Russias gold reserves above US dollars for the first time ever despite pandemic

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.