Elon Musk Brain Chip : मेंदूत बसविणार चिप! एलॉन मस्क निसर्गाला देणार आव्हान, क्रांतीकारक न्यूरालिंक प्रोजेक्ट आहे तरी काय

Elon Musk Brain Chip : सायन्स फिक्शन हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेलच, तर विज्ञानातील कल्पना आता प्रत्यक्षात येऊ घातल्या आहेत. एका प्रकल्पावरुन जगभरात वादळ उठले आहे. थेट निसर्गाला आव्हान देणारा हा प्रकल्प आहे तरी काय..

Elon Musk Brain Chip : मेंदूत बसविणार चिप! एलॉन मस्क निसर्गाला देणार आव्हान, क्रांतीकारक न्यूरालिंक प्रोजेक्ट आहे तरी काय
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 3:17 PM

नवी दिल्ली : सायन्स फिक्शन हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेलच, तर विज्ञानातील कल्पना आता प्रत्यक्षात येऊ घातल्या आहेत. विज्ञानातील संकल्पना, शोध याचा मानवी जीवन आणि अस्तित्वावर काय परिणाम होतो, याचे परिमाण जाणून घेण्याचे हे आधुनिक शास्त्र अनेक अचाट, अफाट, अद्भूत, कल्पनेपल्याडच्या जगात मानव प्रवेश करत आहे. क्रांतीकारक न्यूरालिंक प्रकल्प (Neuralink project) हा पण त्याचाच भाग आहे. जगातील अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क त्याच्या मेंदूत चिप (Elon Musk Brain Chip) बसविणार आहे. एका प्रकल्पावरुन जगभरात वादळ उठले आहे. थेट निसर्गाला आव्हान देणारा हा प्रकल्प नेमका आहे तरी काय..

मिळाली मान्यता या प्रकल्पात मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप बसविण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी त्यासाठी न्यूरालिंक प्रोजेक्ट सुरु केला. मानवी चाचणी करण्यासाठीची परवानगी अमेरिकन प्रशासनाने, एफडीएने मस्क यांना दिली आहे. अनेक दिवसांपासून मस्क यांची कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. याविषयीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे. त्यामध्ये एक माकड मेंदूच्या मदतीने टायपिंग करताना दिसत आहे.

काय आहे हा प्रकल्प कंपनीच्या दाव्यानुसार, ही चिप तुमच्या मेंदूतील विचार वाचू शकते. ज्या व्यक्तीच्या मेंदूत ही चिप बसविण्यात आली. त्याने एक अक्षर जरी उच्चारले नाही तरी, तो मशिनींसोबत संवाद साधू शकतो. सध्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते स्मार्टफोन आणि संगणक नियंत्रीत करत आहेत. ही चिप मेंदूत बसविण्यापूर्वी तिची चाचणी करण्यात येते. त्यानंतरच ती बसविण्यात येते, असे मस्कने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणासाठी उपयोगी हे तंत्रज्ञान दृषिहीन-अंध व्यक्तींसाठी वरदान ठरेल. अंपगत्व आलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. स्मृतीभंश झालेल्या रुग्णांसाठी ही जादूची शक्ती असेल. तसेच मेंदूविकाराशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या जीवनात यामुळे आशेचा एक किरण उगवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ट्विटरवर दिला संदेश एका युझरने या प्रकल्पाची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यात एलॉन मस्कने सर्वात अगोदर स्वतःच्या मेंदूत ही चिप बसविण्याचा निर्णय घेतला असून डेमोसाठी मस्क हे साहस करणार असल्याची माहिती दिली. अजून या चिपचे परिणाम समोर न आल्याने ती बसविण्यात आली नसल्याची माहिती त्याने दिली. या युझरच्या ट्विटला एलॉन मस्कने उत्तर दिले आहे. त्याने ही गोष्ट खरी असल्याचा दुजोरा दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.