AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात सगळे इंधन संपले, पसरला गुडूप अंधार, टीव्हीवर लाईव्ह येते मंत्र्याने केली घोषणा, आमच्या हाती…

जगातला हा छोटासा देश जो आज काळ्या अंधारात बुडाला आहे. ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येत सांगितले की आमच्या हातात काही नाही, काय झाले नेमके ?

या देशात सगळे इंधन संपले, पसरला गुडूप अंधार, टीव्हीवर लाईव्ह येते मंत्र्याने केली घोषणा, आमच्या हाती...
Energy Crisis in Cuba
| Updated on: May 14, 2026 | 8:52 PM
Share

कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावरील छोटासा देश क्युबाचा पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा साठा संपला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अंधकार पसरला आहे. क्युबाची हालत इतकी खराब आबे की राजधानी हवाना सह अनेक भागात रोज २० ते २२ तास वीज गायब असते आणि सगळी शहरे अंधारात बुडाली आहेत. लोकांचे जीवन या ब्लॅक आऊटमुळे वाईटरित्या प्रभावित झाले आहे. सततच्या वीज कपातीने लोकांच्या संतापाचा पारा वाढला आहे.अनेक शहरात लोक शहरातील रस्त्यांवर उतरले आहेत आणि सरकार विरोधात निदर्शने करत आहेत.

वीज कपातीच्या संकटामुळे क्युबाच्या रुग्णालयाती ऑपरेशनची कामे रोखण्यात आली आहेत. मुलांना शिकवणे अडचणी झाले आहे. अनेक कारखाने बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. याच बरोबर सार्वजनिक परिवहन आणि आवश्यक सेवांना देखील या संकटाचा मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची जीवन अक्षरश: नरका समान झाले आहे.

ऊर्जा मंत्र्यांनी केले हात वर , लाईव्ह येऊन केली घोषणा

त्याच वेळी या अडचणींमध्ये क्युबाचे ऊर्जा मंत्री विसेंटे डे ला ओ लेव्ही यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन स्पष्ट केले की देशाकडे आता डिझेल आणि इंधनाचा कोणताही साठा शिल्लक नाही. आमच्या हातात आता काहीच नाही असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की संपूर्ण वीज पुरवठा हा केवळ स्थानिक कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या भरोशाने चालला होता. इंधनाच्या अपुऱ्या पुरवठ्याने वीज यंत्रणा संपूर्ण क्षमतेने काम करत नाहीए. त्यामुळे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे.

या कारणाने बुडाला क्युबा

क्युबाच्या सरकारने आता या वीज संकटासाठी अमेरिकेचे कठोर आर्थिक निर्बंध आणि तेल निर्बंधांना जबाबदार ठरवले आहे. जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकन प्रशासनाने क्युबाला तेल पुरवणाऱ्या त्या कंपन्या आणि जहाजांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर Pemex सह अनेक पुरवठादारांनी तेल पाठवणे बंद केले आहे, ज्यामुळे क्युबाचा ऊर्जा पुरवठा व्यवस्था ठप्प झाली असून देश अंधारात बुडाला आहे. व्हेनेझुएला दीर्घकाळापासून क्युबाला स्वस्तात तेल पुरवठा करत होता. परंतू साल २०२६ पासून झालेल्या राजकीय बदल आणि अमेरिकेच्या कारवाईने हा पुरवठा देखील बंद झालेला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...