AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक सिगारेटवर आता सावधानतेचा इशारा छापणार, नपुंसक आणि कॅन्सर होण्याचा धोका प्रसिद्ध केला जाणार

सिगारेटवर छापलेली वैधानिक इशारा सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींना सहज दिसेल असा छापला जाणार आहे.

प्रत्येक सिगारेटवर आता सावधानतेचा इशारा छापणार, नपुंसक आणि कॅन्सर होण्याचा धोका प्रसिद्ध केला जाणार
cigaretteImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 04, 2023 | 9:44 PM
Share

नवी दिल्ली | 2 ऑगस्ट 2023 : सिगारेट्स पिणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे सिगारेट्स पाकिटावर सरकार वैधानिक इशारा छापत असते. आता कॅनडा देशाने त्यांच्या नागरिकांनी सिगारेट्सचे व्यसन सोडावे यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. कॅनडा सरकारने म्हटले आहे की विक्री होणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर व्यक्तिगत स्वास्थ्य चेतावणी दिली जाणार आहे. असे करणार कॅनडा हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

आता इथून पुढे कॅनडात विकली जाणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर स्वास्थ्य चेतावणी लिहीली जाईल. सिगारेट्सवर लिहीले जाईल की सिगारेट्सने नपुंसकता आणि कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. याच बरोबर प्रत्येक झुरक्या सोबत विष असेही सावधानतेच्या सूचनेत लिहीलेले असेल. कॅनडा सरकारला वाटते की यामुळे देशातील सिगारेट्स पिणाऱ्यांच्या प्रमाणात कमी येईल.

धूम्रपान सोडण्यास मदत होणार

कॅनडाने गेल्या मे महिन्यात स्वास्थ्य संबंधी नियमावली जारी करण्याचे जाहीर केले होते. त्याची जगभरात चर्चा झाली होती. तम्बाकू उत्पादनांची पॅकेजिंग आणि चेतावनी नियम सरकारने अशा युवकांसाठी तयार केले आहेत जे सिगारेट्स सोडू इच्छीत आहेत.

यामुळे घेतला निर्णय 

सिगारेटवर छापलेली वैधानिक इशारा सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींना सहज दिसेल असा छापला जाणार आहे. लोक एक सिगारेट्स विकत घेऊन पितात. त्यामुळे असे लोकांना पाकिटावर छापलेल्या सूचना दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सिगारेट्सवर सूचना छापण्याची गरज निर्माण झाल्याचे कॅनडाचे माजी व्यसनमुक्ती मंत्री कॅरोलिन बेनेट यांनी सांगितले. प्रत्येक सिगारेट्सवर छापलेली सूचना पाहून लोकांचे लक्ष जाईल. या नियमाद्वारे 2035 पर्यंत देशातीस तम्बाकूजन्य पदार्थांची विक्री पाच टक्के कमी करण्याची योजना आहे.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.