Corona : फेसबुक न्यूज इंडस्ट्रीला 10 कोटी डॉलरची मदत करणार

कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशातील सरकारला मदत करत (Facebook help to news industry) आहेत.

Corona : फेसबुक न्यूज इंडस्ट्रीला 10 कोटी डॉलरची मदत करणार
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 10:43 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशातील सरकारला मदत करत (Facebook help to news industry) आहेत. आता सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना साथीच्या रोगा दरम्यान फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत (Facebook help to news industry) करणार आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूबद्दलच्या बातम्या सर्व न्यूज चॅनेल, वृत्तपत्र प्रसारित करत आहेत. या सर्वांसाठी फेसबुकने एक इंवेस्टमेंट फंड बनवला आहे. या माध्यमातून कंपनी 25 मिलियन म्हणजे 2.5 कोटी अमेरिकी डॉलर फेसबुक जर्नलिझम प्रोजेक्टच्या माध्यमातून स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना दिले जाणार आहे. या इमेरजेन्सी फंडचे उद्दीष्ट म्हणजे या महामारी दरम्यान न्यूज इंडस्ट्रीला मदत पोहोचवणे आहे.

याशिवाय फेसबुकने 75 मिलियन डॉलर म्हणजे 7.5 कोटी डॉलर इतर मार्केटिंगसाठी खर्च करणार आहे. फेसबुककडून पहिल्या टप्प्यातील मदत ही अमेरिका आणि कॅनडामधील 50 न्यूज चॅनेलला करण्यात आली आहे. तसेच पब्लिशर्सला मिळालेल्या मदतीतून ते कोरोना विषाणूच्या सर्व बातम्या प्रसारित करत आहेत. यामध्ये रिपोर्टरचा प्रवास खर्च, रिमोट कार्याची क्षमता आणि फ्री-लान्स रिपोर्टसची भरती या कामाचा समावेश आहे. यामाध्यमातून कोरोना विषाणूं संबंधित सर्व माहिती प्रत्येक वृत्तसंस्था कव्हर करत आहे.

याशिवाय फेसबुकने म्हटले की, “कठीण काळात आम्ही ज्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहोत त्यांना मदत करणार आहे आणि अशा देशातील न्यूज इंडस्ट्रीलाही आर्थिक मदत करणार आहे.”

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण हे अमेरिका, इटलीमध्ये आहेत. तर या देशात कोरोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.