वॉशिंग्टन : सध्या जगभरात अणुयुद्धाचा धोका वाढलाय. याआधीच्या दोन्ही जागतिक युद्धामध्ये झालेल्या नुकसानाचे तपशील पाहिले तर पुढील महायुद्धात पृथ्वीवरील जीवनच संकटात येईल की काय अशी परिस्थिती तयार झालीय. त्यातच आता जगभरातील अण्वस्त्रांवर लक्ष ठेऊन असलेल्या फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट (FAS) या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यात कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र आहेत याची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे या नव्या आकडेवारीनुसार पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्र असल्याचं समोर आलंय (FAS report on Nuclear bomb statistics in world India Pakistan Russia America North Korea).