Special Story | जगाला हादरवणारा अणू बॉम्ब 7200 फुटांवरुन कोसळला आणि गायब झाला, 63 वर्षांनंतर अद्यापही रहस्य गुलदस्त्यात

इमरजन्सी लँडिंगदरम्यान बॉम्बचा विस्फोट होण्यापासून रोखण्यासाठी बॉम्बला रिलीज करण्याची परवानगी मागितली.

Special Story | जगाला हादरवणारा अणू बॉम्ब 7200 फुटांवरुन कोसळला आणि गायब झाला, 63 वर्षांनंतर अद्यापही रहस्य गुलदस्त्यात
Nuclear Bomb
Nupur Chilkulwar

|

Feb 06, 2021 | 8:27 AM

मुंबई : टायबी द्वीपवर (Tybee Island) 5 फेब्रुवारी 1958 ला एक अशी घटना घडली (Nuclear Bomb Dropped And Disappears In Water) ज्यामध्ये अमेरिकेच्या वायू सेनेने (US Airforce) सवाना, जॉर्जियाजवळील टायबी द्वीपच्या पाण्यात एक 7,600 पाउंड (3400 किलोग्राम) वजनाचा मार्क-15 परमाणु बॉम्ब (Mark-15 Nuclear Bomb) हरवला. अभ्यासादरम्यान, एक एफ-86 लढाऊ विमान बी-47 बॉम्बरची (B-47 Bomber) विमानासोबत धडक झाली. दुर्घटनेच्या परिस्थितीत संशयित विस्फोटाने एअरक्रूजला वाचवण्यासाठी बॉम्ब फेकून देण्यात आला. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर अंदाज लावण्यात आला की हा बॉम्ब टस्बी द्वीपच्या किनारी हरवला (Nuclear Bomb Dropped And Disappears In Water).

बी-47 बॉम्बर विमान फ्लोरिडामध्ये होमस्टेड एअर फोर्स बेसच्या एक कृत्रिम लढाऊ मिशनवर होता. हा एक 76,00 पाउंड (3400 किलोग्राम) वजनाच्या बॉम्बला घेऊन जात होता. जवळपास 2 वाजता याची एफ-86 सोबत धडक झाली. विमानातून पायलट उतरल्यानंतर एफ-86 अपघातग्रस्त झाला. बी-47 हवेत होता. कर्नल रिचर्डसनने जेव्हा उड्डाणाचं कंट्रोल आपल्या हातात घेतला तेव्हा तो 38,000 फुटांवरुन 18,000 फुटांवर आला होता.

◊  72,00 फूटांवर बॉम्ब पडला ◊ 

चालक दलाने वजन कमी करण्यासाठी आणि इमरजन्सी लँडिंगदरम्यान बॉम्बचा विस्फोट होण्यापासून रोखण्यासाठी बॉम्बला रिलीज करण्याची परवानगी मागितली आणि परवानगी देण्यात आली. बॉम्बला 7,200 फूटांवरुन सोडण्यात आलं. या दरम्यान बॉम्बर 370 किमी प्रती तासाच्या गतीने उडत होता. जेव्हा बॉम्बला समुद्रात पाडण्यात आलं तेव्हा चालक दलाने विस्फोट पाहिला नाही आणि ते बी-47 ला हंटर एअर फोर्स बेसवर यशस्वीपणे लँड करण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर पायलट कर्नल हॉर्वड रिचर्डसन यांना विशेष फ्लाईंग क्रॉसने सन्मानित करण्यात आलं.

◊ ना विस्फोट ना बॉम्ब ◊ 

काही स्त्रोत बॉम्बला एक कार्यात्मक अणू शस्त्र असल्याचं सांगतात. तर काही जण हा डिसेबल असल्याचं सांगतात. जय या बॉम्बच्या आत प्लुटोनियम अणू कोअर स्थापन करण्यात आला असेल तर हे पूर्णपणे एक कार्यात्मक शस्त्र होतं. पण जर यात डमी कोअर लागलेला असेल तर हा विस्फोट करण्यात असमर्थ ठरेल. पण, यामुळे एक प्रकारचा विस्फोट होऊ शकला असता. 12 फूट लांब मार्क 15 बॉम्बचं वजन 7600 पाउंड होतं आणि याचा सीरिअल नंबर 47782 होता. यामध्ये 400 पाउंडचे उच्च विस्फोटक आणि अत्यंत समृद्ध युरेनिअम लागलेलं होतं (Nuclear Bomb Dropped And Disappears In Water).

◊ जगाला हादरवून सोडणारा बॉम्ब गायब? ◊ 

6 फेब्रुवारी 1958 पासून सेनेने या बॉम्बला शोधण्यास सुरुवात केली आणि 16 एप्रिलला घोषणा करण्यात आली की या बॉम्बची शोध मोहिम अयशस्वी ठरली. 2004 मध्ये एकदा पुन्हा याच्या स्थितीबाबत दावे करण्यात आले. पण, बॉम्बचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. जगाला हादरवून सोडणारा हा बॉम्ब अखेर कुठे गायब झाला, हे अद्यापही एक रहस्य आहे.

Nuclear Bomb Dropped And Disappears In Water

संबंधित बातम्या :

Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

Special Story | ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीनसह इतर उपकरणांचा उपयोग फायदेशीर की नुकसानकारक?

Special Story | मुंबईकरांना भुरळ पाडणारा प्रसिद्ध ‘काळा घोडा फेस्टिव्हल’, वाचा याचा इतिहास…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें