मी फ्लायदुबईत नोकरी करण्यापूर्वीच रचला कट, चाैकशीत ओमानी पायलटचे हादरवणारे खुलासे, थेट..
फ्लायदुबईच्या विमानात जी घटना घडली, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता याबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. ओमानच्या पायलटने फ्लायदुबईमध्ये नोकरी करण्यापूर्वीच कट रचला होता. हेच नाही तर याकरिताच त्याने फ्लायदुबईमध्ये नोकरी करण्याचाही निर्णय घेतला.

फ्लायदुबईच्या विमानाबद्दल मोठी माहिती पुढे येतंय. ओमानचा को पायलट FZ1073 विमानाला क्रॅश करत होता. त्याने अगोदरच पूर्ण कट रचला. गेल्या काही महिन्यांपासून तो यावर काम देखील करत होता. भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर त्याने हल्ला केला. त्यातच आता ओमानी पायलट हम्माम अल हम्मामी याच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. युएईमध्ये सुरू असलेल्या चाैकशीत त्याने मान्य केले की, पायलट स्मित मच्छार याला मारून विमान थेट इस्त्रायलच्या गुरियन इंटरनॅशनल एअरपोर्टजवळील कोणत्याही मोठ्या इमारतीला धडकावचे. इस्त्रायली मिडिया रिपोर्टनुसार, जर हा हल्ला टळला नसता तर 2001 च्या 9\11 सारखा हल्ला झाला असता आणि इस्त्रायलमध्ये मोठी खळबळ उडाली असती. युएई आणि सऊदी अरेबियातील एजन्सींकडून ओमानच्या पायलटची चाैकशी केली जात आहे.
ओमानच्या पायलटला विचारण्यात आले की, त्याने फ्लायदुबईचे विमानच का निवडले? त्याने म्हटले की, मी सर्वकाही माहिती घेतली की, इस्त्रायलच्या तेल अवीवला सरळ कोणते विमान जाते. त्यामुळे मी फ्लायदुबईची निवड केली. मी या एअरलाईन्समध्ये नोकरी करण्यापूर्वीच सर्व कट रचला होता. हा कट अगोदरपासूनच माझ्या डोक्यात होता.
मागच्या काही महिन्यात मी बऱ्याचदा गुरियन एअरपोर्टला आलो. जूनमध्ये इस्त्रायलला आलो. मी त्यावेळी सर्व गुप्त माहिती घेत होतो. मी नक्शाही तयार केला. जुलै महिन्यातच मी हा हल्ला घडवून आणणार होतो. पण त्यावेळी विमानात असलेल्या क्रू मेंबरमध्ये माझा जवळचा मित्र होता. ज्यामुळे मी ऐनवेळी प्लान बदलला. इतालवी पत्रनुसार, Corriere della Ssara ने त्यादिवशी कॉकपिटमध्ये नक्की काय काय घडले हे सांगितले.
सकाळी 9.20 ला ताली मानेस आपल्या 5 वर्षाच्या मुलीला घेऊन टॉयलेटमध्ये गेली. त्यावेळी तिला कॉकपिटमध्ये ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर तिने तात्काळ बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या ऑफ ड्यूटी पायलटला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पायलटने कॉकपिटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण कोड बदलण्यात आला. त्यानंतर भारतीय पायलटने गंभीर जखमी असतानाही कॉकपिटचा दरवाजा उघडला. यादरम्यान आपला कट पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच हम्माने विमान रेगिस्तानमध्ये क्रॅश करण्याचा निर्णय घेतला. 17000 पर्यंत त्याने विमान खाली आणले.
