FlyDubai Flight प्रकरणात मोठा खुलासा, 6 वर्षीय मुलगी टॉयलेटमध्ये गेली अन् 174 लोकांचे प्राण वाचले, नेमकं काय घडलं?
FlyDubai Flight: फ्लायदुबई प्रकरणाचा तपास सुरु असून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. आता एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्य वाटेल.

FlyDubai Flight Incident:संयुक्त अरब अमिराती (UAE) ते इस्रायलमधील तेल अवीव या फ्लाईदुबईच्या विमानात घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. ओमानी सहवैमानिकाने भारतीय वैमानिकावर हल्ला केला. या प्रकरणाचा आता तपास सुरु आहे. हल्ला होत असताना विमान खाली कोसळू लागले होते, पण नंतर कसेबसे भारतीय वैमानिक स्मिथ माछरने त्यावर कंट्रोल मिळवला आणि इतका मोठा अपघात टळला आहे. या तपासात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे.
फ्लायदुबईच्या विमानात एक सहा वर्षीय मुलगी नीनाला टॉयलटला गेली. जेव्हा कॉकपिटमधून हृदयद्रावक किंकाळ्या ऐकू आल्या, तेव्हा सहा वर्षांची नीना टॉयलटमध्ये होती. प्रवासी झ्विका मानेस यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, “त्यांची मुलगी टॉयलटला गेली होती. अगदी थोड्याच वेळात त्यांना मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ते लगेच उठले आणि आपल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी टॉयलटकडे धावले. बाबा, मला मरायचे नाहीये. अशा किंचाळ्या ऐकू येऊ लागस्यामुळे मी पटकन धाव घेतली, यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले.”
एका वृत्तानुसार, मानेस यांनी सांगितले की कॉकपिटचा दरवाजा थोडा उघडा होता आणि कॅप्टन स्मित मछार पूर्ण रक्ताने माखलेले होते. ते ओमानच्या सह-वैमानिकाशी झटापट करत होते. कॉकपिटमध्ये गोंधळ उडाला होता आणि सर्वत्र रक्त रक्त झाले. सह-वैमानिक त्यांच्यावर हल्ला करत होता. मानेस आणि इतरांनी सह-वैमानिकाला पकडले आणि त्यांनी त्याला विमानाच्या हेडफोन सेटच्या केबलने बांधले.
सहवैमानिकांनी नंतर या विमानावर ताबा घेतला आणि विमान सौदी अरेबिया इथे तातडीने उतरवले. यानंतर तात्काळ स्मिथ माछर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. या खऱ्या आयुष्यातील हिरोचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. इतक्या धाडसाचे काम केल्याबद्दल त्यांची इस्त्रायलचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही स्मिथचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.
