डोनाल्ड ट्रम्प सत्तेच्या धुंदीत, या देशाकडून थेट अणुहल्ल्याची तयारी, जगात खळबळ, थेट…
डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयाचा फटका फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला बसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी मोहिम समुद्रात सुरू केलीये. नुकताच त्यांनी रशियाचे जहाज जप्त केले. रशिया, अमेरिका आणि चीनमधील तणाव प्रचंड वाढला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्याप्रकारे सध्या निर्णय घेत आहे, त्यावरून स्पष्ट होतंय की, जग नक्कीच महायुद्धाचा उंबरठ्यावर आहे. शेजारच्या छोट्या देशावर हल्ला करून थेट अध्यक्षाला अमेरिकेने अटक केले आणि त्यांच्या तेलावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. शिवाय इराणसह अजून काही देशांना मोठ्या धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या. भारताला थेट 500 टक्के टॅरिफची मोठी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेने मॅरिनेरा नावाचा रशियन ध्वज असलेला तेलवाहू जहाज जप्त केले. ज्यामुळे अटलांटिक महासागरात दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया आणि अमेरिकेचे संबंध तसे फार कधी चांगले राहिले नाही. युक्रेनला रशियाविरोधात युद्धात थेट मदत करताना अमेरिका दिसली. रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अनेक देशांवर सध्या अमेरिकेचा एक दबाव बघायला मिळतो. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिका दबाव आहे.
अमेरिकेच्या रशियाविरोधात वाढलेल्या काड्यांनंतर आता थेट संरक्षणविषयक राज्य समितीचे उपाध्यक्ष आणि रशियन संसद सदस्य अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अमेरिकेला अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही पद्धतीने रशियाला अडकवण्यासाठी अमेरिकेकडून मोठी प्रयत्न केली जात आहेत. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही अमेरिका धडाधड टॅरिफ आकारत आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाचे सदस्य अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अमेरिकेने रशियन ध्वज असलेला तेलवाहू जहाज जप्त केल्यानंतर म्हटले की, मॉस्कोने अमेरिकेला लष्करी प्रत्युत्तर दिले पाहिजे. रशियाने पाणबुडीद्वारे हल्ला करावा, अशी सूचना केली आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, रशियाच्या लष्करी सिद्धांतामध्ये राष्ट्रीय हितासाठी अण्वस्त्रांच्या वापराचा उल्लेख आहे.
अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुद्रात चाचेगिरीचा अवलंब केला आहे. हे रशियन भूभागावरील हल्ल्यासारखेच आहे… यामुळे आता रशिया आणि अमेरिकेतील तणाव अधिकच वाढणार हे स्पष्ट होतंय. शिवाय रशियाला कोडींत पकडण्यासाठी प्रत्येक प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. भारत, चीन आणि ब्राझीलवर रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी, याकरिता अमेरिकेचा मोठा दबाव आहे.
