कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या 8 भारतीयांबद्दल महत्त्वाची माहिती
Indians death penalty in qatar | कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. मागच्या महिन्यात या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्याची बातमी समोर आल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Indians death penalty in qatar | कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. आता कतारमधील एका न्यायालयाने या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधातील अपील स्वीकारल आहे. कोर्टात लवकरच या अपीलावर सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. कतारच्या कोर्टाने मागच्या महिन्यात 26 ऑक्टोबरला माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारत सरकार सतत कतारच्या संपर्कात होतं.
वेगवेगळ्या डिप्लोमॅटिक चॅनलमधून प्रयत्न केल्यानंतर माजी अधिकाऱ्यांच्या अपीलचा स्वीकार करण्यात आला आहे. भारत सरकार या संपूर्ण विषयात कायदेशीर प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहे. कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. कतारच्या कोर्टाने अपील स्वीकार केल्यानंतर आता पुढे काय होणार?
कतारमध्ये कशी आहे न्यायालयीन प्रक्रिया?
खालच्या न्यायालयातील निर्णयाविरोधात आता वरच्या कोर्टात अपील करण्यात आलं आहे. वरच्या कोर्टातही भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल. न्यायलयीन प्रक्रियेनंतर अमीर म्हणजे कतारचा राजा कुठल्याही कैद्याला शिक्षेतून माफी देऊ शकतो.
कधी अटक झालेली?
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय नौदलाच्या या निवृत्त आठ अधिकाऱ्यांना कतारच्या सुरक्षा एजन्सीने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली होती. अनेक महिने वेगवेगळ्या सेलमध्ये ठेऊन या कैद्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. बऱ्याच महिन्यानंतर या कैद्यांना अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटू देण्याच आलं. अटक केलेल्या अधिकाऱ्यांना बऱ्याच महिन्यानंतर समजलं की त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आलीय. खालच्या कोर्टात खूप संशयास्पद पद्धतीने सुनावणी झाली. कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावेपर्यंत केसशी संबंधित तथ्यांची माहितीच दिली नाही. कतार कोर्टाचा निर्णय आश्चर्यकारक आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.
भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची नावं
कमांडर पूर्णेंदु तिवारी
कमांडर संजीव गुप्ता
कॅप्टन नवतेज सिंह गिल
कॅप्टन सौरभ वशिष्ठ
कॅप्टन बीरेन्द्र कुमार वर्मा
कमांडर सुगुनाकर पकाला
कमांडर अमित नागपाल
सेलर राजेश
