Cargo Ship hijack | हेलीकॉप्टरमधून आले, ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा, मोठं जहाज कसं हायजॅक केलं तो VIDEO
Cargo Ship hijack | अगदी चित्रपटात दाखवतात तसच हे जहाज हायजॅक केलं. हूती दहशतवाद्यांनी म्हटलय की, ही तर सुरुवात आहे. इस्रायलला आता आणखी अशा हल्ल्यांसाठी तयार राहिलं पाहिजे. हायजॅक केलेलं जहाज इस्रायलशी संबंधित आहे, असा हूती दहशतवाद्यांचा दावा आहे.

नवी दिल्ली : हूती दहशतवाद्यांनी एकदम फिल्मी स्टाइलमध्ये कार्गो शिप हायजॅक केलं. अनेकदा चित्रपटात अशा प्रकारची Action पाहायला मिळते. हूती दहशतवाद्यांनी समुद्राच्या मधोमध एक जहाजाचा अशा प्रकारे हायजॅकिंग केलं. जहाजाच्या हायजॅकिंगचा हा व्हिडिओ लाल सागरातील आहे. रेड सी मध्ये मार्गक्रमण करणाऱ्या एका जहाजावर हूती दहशतवादी हेलिकॉप्टरमधून उतरले. त्यांनी ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देत फायरिंग सुरु केली. जहाजावर उतरल्यानंतर पुढे जात केबिनमध्ये गेले. तिथे असलेल्या स्टाफला त्यांनी सरेंडर करायला सांगितलं. या जहाजावर 25 जण होते. हूती दहशतवाद्यांनी या हायजॅकिंगचा व्हिडिओ हूती टीव्ही चॅनल अल मशीराहवर रिलीज केलाय. हायजॅक केलेलं जहाज इस्रायलशी संबंधित आहे, असं या हूती दहशतवाद्यांचा दावा आहे. इस्रायलने हूती दहशतवाद्यांचा हा दावा खोडून काढला आहे.
हूती मिलिटेंट्सनी हायजॅक केलेलं जहाज गॅलेक्सी लीडर शिप या ब्रिटिश कंपनीच्या नावावर आहे. जापानमधून हे जहाज ऑपरेट होतं. सौदी अरेबियाच्या जेद्दामधील दक्षिण-पश्चिमेला लाल सागरात असताना हे जहाज हायजॅक करण्यात आलं. सॅटेलाइट ट्रॅकिंग डेटावरुन ही माहिती मिळालीय. येमेनच्या होदेइदा शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर असताना हे जहाज हायजॅक करण्यात आलं.
‘इराणच हे दहशतवादी कृत्य’
कार्गो शिपमध्ये एका इस्रायली अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळेच येमेनमधील हूती दहशतवाद्यांनी या जहाजावर हल्ला केला. पण शिपच रजिस्ट्रेशन ब्रिटीश कंपनीच्या नावावर आहे. हूती दहशतवाद्यांच्या या कृतीने इस्रायल-हमास युद्धाच्या आगीत तेल ओतण्याच काम केलं आहे. “इराणच हे दहशतवादी कृत्य असून जागतिक स्तरावरील एक मोठी घटना आहे” असं इस्रायलने म्हटलं आहे.
Yemen Houthis have released this footage of hijacking an Israeli civilian ship as a protest for Gaza war.
Show this to the ones talking about war principles!pic.twitter.com/rsAt7Z2Hm2
— Shining Star 🇮🇳 (@ShineHamesha) November 20, 2023
‘ही तर सुरुवात आहे’
हूती दहशतवाद्यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. ही तर सुरुवात आहे, तुम्हाला अजून अशा हल्ल्यांसाठी तयार राहिलं पाहिजे. हूती प्रमाणेच सर्वच इस्लामिक देशांनी आता इस्रायलविरोधात एकजूट करावी असा हमासने आवाहन केलय. हायजॅक केलेलं जहाज जापानने भाड्यावर घेतलं होतं.