Trump News: राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी जाहीर केला US चा नवा मॅप, कॅनडाला दाखविले अमेरिकेचे राज्य

कॅनडातील विरोधकांच्या आणि जनतेतील घटत्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा जस्टीन ट्रूडो यांनी दिल्यानंतर कॅनडात राजकीय अस्थिरता असताना जागतिक महासत्तेच्या होऊ घातलेल्या प्रमुखाने असे वक्तव्य केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Trump News: राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी जाहीर केला US चा नवा मॅप, कॅनडाला दाखविले अमेरिकेचे राज्य
Donald Trump and Justin Trudeau
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 1:50 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या अनेक नेत्यांना नाराज केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा नवा नकाशा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे कॅनडाला या नकाशात अमेरिकेचे राज्य दाखविले आहे. यावर कॅनडाचे माजी पंतप्रधान यांनी तातडीने खुलासा केला आहे की त्यांचा देश कधी अमेरिकेचा भाग बनणार नाही. परंतू ट्रम्प यांच्या आक्रमकपणे आपला इरादा स्पष्ट केल्याने कॅनडा संदर्भात ते काही करु शकतात हे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता कॅनडा अमेरिकेचा भाग बनणार तर नाही ना ? अशी चर्चा आता सुरु झालेली आहे. अशात जर कॅनडा सारखा देश देश अमेरिकेचा भाग झाला तर ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान ? त्यांच्या समोर काय असणार आव्हान हे पाहूयात…

हे सुद्धा वाचा

सध्या अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी आहे. आणि कॅनडाची लोकसंख्या ४ कोटी आहे. अमेरिकेचा कॅनडाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. अमेरिकेला विदेशातून सर्वात जास्त कमाई कॅनडातून होते. कॅनडा आणि अमेरिकेचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. कॅनडा अमेरिकेतून ८० टक्के आयात करतो.

कॅनडात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठी आहे. तेल, लाकूड आणि स्वच्छ पाण्याचे मोठा साठा आहे. जर दोन्ही देशांचे विलीनीकरण झाले तर अमेरिकेला ही संपत्ती मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी ताकदवान होणार आहे. यामध्ये कर प्रणाली, नियम आणि व्यापार धोरणे यांचा ताळमेळ बसवावा लागणार आहे.

कॅनडाची अर्थव्यवस्था अनेक बाबतीत अमेरिकेवरच अवलंबून आहे. कॅनडा जर अमेरिकेला जोडला गेला तर अमेरिकेला नक्कीच फायदा होईल, पण त्याच बरोबर अनेक आव्हाने देखील असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना नेहमीच कॅनडा आपले ५१ वे राज्य असावे अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. हि बाब त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये कॅनडाचे तत्कालिन पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितली होती.

ट्रम्प यांचा जोरदार प्रतिवाद

हा नकाशा शेअर केल्यानंतर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी लागलीच टीका केली आणि अमेरिकेत आमचा देश सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. तर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी यावर जोरदार विरोध करणारी प्रतिक्रीया दिलेली आहे. कॅनडाबद्दल ट्रम्प यांना कमी माहिती आहे हे यावरुन स्पष्ट होते,आमची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि आमचे लोकही मजबूत आहेत. आम्ही कोणाच्याच दबावापुढे झुकणार नाही.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.