मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते फुकट
Free Beer : व्हिएतनाम हा एक असा देश आहे जिथे पाणी महाग आहे आणि बिअर स्वस्त आहे. त्यामुळे या देशात हॉटेलमध्ये मोफत बिअर दिली जाते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतासह देशभरात मद्यप्रेमींची संख्या मोठी आहे. अनेकजण विरंगुळा म्हणून दारू पितात. भारतातील दारूच्या किंमती काही दिवसांपूर्वी वाढलेल्या आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींना दारूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मात्र जगात असे काही देश आहेत जिथे पाणी महाग आहे आणि बिअर स्वस्त आहे. त्यामुळे काही देशांमधील हॉटेल्समध्ये पाण्यासोबत मोफत बिअर देखील दिली जाते. आशियात असे काही हॉटेल्स आहेत जिथे दिवसातील विशिष्ट वेळेत मोफत बिअर दिली जाते. यातील एका देशाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हिएतनाम हा एक असा देश आहे जिथे पाणी महाग आहे आणि बिअर स्वस्त आहे. त्यामुळे या देशात हॉटेलमध्ये मोफत बिअर दिली जाते. व्हिएतनाम आणि इतर अनेक देशांमध्ये बिअर स्वस्त का आहे? तसेच हॉटेलमध्ये मोफत बिअर का दिली जाते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे कारण म्हणजे व्हिएतनाम हा एक लहान देश आहे. जगातील सर्वात स्वस्त बिअर या देशात मिळते.
व्हिएतनाममध्ये बिअर स्वस्त का आहे?
व्हिएतनाममध्ये बिअर स्वस्त असण्याचे कारण हे स्थानिक संस्कृती, कर आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन याच्याशी जोडलेले आहे. ‘बिया होई’ म्हणून ओळखली जाणारी बिअर ही ब्रँड बिअर आहे. ही बिअर दररोज स्थानिक ब्रुअरीजमध्ये तयार केली जाते आणि त्याच दिवशी ताजी विकली जाते. ती बाटलीत बंद केली जात नाही, तर थेट बॅरलमधून दिली जाते, त्यामुळे तिच्या उत्पादनाचा खर्च कमी आहे. या स्थानिक बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त दोन ते तीन टक्के असते. ही बिअर तांदूळापासून बनवली जाते. या बिअरवर खूप कमी कर असतो, त्यामुळे इथे स्वस्त बिअर मिळते. त्यामुळे ती व्हिएतनाममधील हॉटेलमध्ये मोफत दिली जाते.
व्हिएतनाममध्ये पाणी महाग
व्हिएतनाममध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये बिया होई बिअरचा एक ग्लास फक्त 5000 ते 10000 व्हिएतनामी डोंग (अंदाजे 18 ते 35 रुपये) मध्ये मिळतो. मात्र 500 मिली पाण्याच्या एका बाटलीची किंमत 30000 (100 रुपयांच्या आसपास)डोंग आहे. म्हणजेच या देशात बिअर ही पाण्यापेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये मुक्कामी राहणाऱ्या लोकांना ती मोफत दिली जाते.
