येथे हॉर्नचा आवाज नाही, पक्ष्यांचा कलकलाट तेवढा ऐकू येतो, भेट द्या जगातील सर्वात शांत शहराला
एकीकडे लोक घड्याळ्याच्या काट्यावर धावतात, मिनिट काय सेंकदाला देखील महत्व देतात. मात्र जगात एक असे शहर आहे जेथे लोकांना सर्वात मोठा आवाज हा पाण्याच्या वल्हवण्याचा असतो किंवा पक्षांच्या किलबिलाटाता...कोणते हे शांत शहर आहे ते वाचा....

मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरात सकाळ पासून रात्रीपर्यंत हॉर्नचा गोंधळ आणि ट्रॅफीक जामच कटकट असते. येथे हवेत ऑक्सिजन कमी आणि कार्बनच अधिक असतो. समजा सकाळी तुम्ही झोपेतून जागे व्हाल आणि खिडकी खोलाल तर वाहनांच्या हॉर्न ऐवजी पाण्याचा झुळूझुळू आवाज येत असेल आणि सोबत पक्ष्यांचा किलबिलाट..ऑफीसला जाण्यासाठी कार नव्हे तर छोटीशी इलेक्ट्रीक बोट गॅरेजमध्ये असेल. हे कोणती काल्पनिक कथा नसून असे शहर जगात आहे. नेदरलँड येथील गिएथूर्न भागाचे रोजचे जगणे आहे. येथील जीवन इतके निवांत आहे क यास नॉर्थचे व्हेनिस म्हटले जाते. आजच्या जगात दोन मोठ्या समस्या आहेत एक ग्लोबल वॉर्मिंग आणि मानसिक तणाव. गिएथूर्नचे जीवन समाधानाचे आहे.
शहर म्हटले की डोक्यात फ्लायओव्हर्स, ट्रॅफीक सिग्नल आणि प्रदुषणाचे धुकं असते. परंतू या भागात एकही रस्ता नाही. एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी नावेचा उपयोग केला जातो. किंवा लाकडी पुलांचा वापर करुन प्रवास करावा लागतो. लोक त्यांचा किराणा ते फर्निचर नावेतूनच येथून तेथे नेतात. येथील सरकारने रस्त्यांचा प्रस्ताव यासाठी ठोकरुन लावला की त्यांची शांतता भंग होईल. येथे ज्या होड्या चालवल्या जातात. त्यांनाही इलेक्ट्रीक मोटर असल्याने त्यांचा आवाज होत नाही. त्यांना व्हीस्पर बोट्स असे म्हटले जाते. या बोटी जराही आवाज करत नाहीत. या गावातील हवा इतकी शुद्ध असते की शहरातून आलेल्यांना पहिल्यांदा आपले श्वास जड वाटतात. येथे जोराचा येणारा आवाज फार तर एखाद्या पक्षाचा असू शकतो किंवा नावेच्या वल्हवण्याचा..येथे लोक पायी चालणे, सायकल किंवा नावेच्या आधारे प्रवास करणे पसंद करतात.अनेक लोकांनी ऑफीसला जाण्यासाठी पदरी या ‘व्हीस्पर बोट्स’ बाळगल्या आहेत. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी १० मिनिटेही पुरेशी आहेत. कारण येथे कोणताही ट्रॅफीक जाम नाही. येथे इमर्जन्सी मदतीसाठी मात्र एम्ब्युलन्स बोटी जरुर आहेत.
या ठिकाणच्या लोकांनी त्यांची मुळं आणि निसर्ग जपून ठेवला आहे. परिणामी, जेव्हा उर्वरित जग उष्णतेच्या लाटा, नैराश्य आणि प्रदुषणाचा सामना करत असताना येथील लोक आपल्या बोटींतून शांतपणे विहार करीत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांना वातानुकूलित यंत्रणांची (AC) काहीच गरजच भासत नाही; कोणत्याही आधुनिक यांत्रिक साहित्याच्या मदतीशिवाय हे लोक अत्यंत समाधानाने जीवन जगत आहेत.. या ठिकाणचे केवळ ‘जलमार्ग’च अद्वितीय आहेत असे नाही—तर येथील घरेही तितकीच खास आहेत. प्रत्येक घराचे छप्पर गवताने शाकारलेले असते. प्रत्येक घरासमोर एक सुंदर बाग वसलेली असते, जी थेट नदी वा कालव्याच्या पाण्यापर्यंत पसरलेली असते.
