जळगावात सोने दर 34 हजारावर, पाकिस्तानात प्रतितोळा 80 हजार 500

राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून तो 34,470 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. इकडे मुंबईतही ट्रेडिंग बंद होईपर्यंत सोने दराने 34,588 रुपयांपर्यंत मजल मारली.

जळगावात सोने दर 34 हजारावर, पाकिस्तानात प्रतितोळा 80 हजार 500

मुंबई : इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे जगभरात सोने दरात वाढ होत आहे. भारतात सोने दरात 200 रुपयांनी वाढ झाल्याने प्रतितोळ्याचा दर 34 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. जळगाव सराफ बाजारातील हा दर आहे.

तिकडे राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून तो 34,470 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. इकडे मुंबईतही ट्रेडिंग बंद होईपर्यंत सोने दराने 34,588 रुपयांपर्यंत मजल मारली.

पाकिस्तानात सोने प्रतितोळा 80 हजारांवर

भारतात सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 35 हजारांपर्यंत पोहोचला आहे. मात्र पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये मंगळवारी सोने दरात तब्बल 1300 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल 80 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

भारतात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, तर पाकिस्तानमध्ये 1 तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा दर 69 हजार 016 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने दरवाढीची कारणे

  • आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने दराने उच्चांक गाठला आहेच, शिवाय देशांतर्गत कारणेही दरवाढीला कारणीभूत आहेत.
  • रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचं धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदार बँकेऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला.
  • अमेरिका, चीन, इंग्लंड आणि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशात व्याजदरात कपात होत आहे. त्यामुळे या सर्व देशांतील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.

संबंधित बातम्या

ऐन रमजानच्या महिन्यात महागाईने पाकिस्तानला रडवले, मटण 1100 रुपये किलो 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *