Plane Crash : भीषण अपघात, विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट समुद्रात कोसळलं, VIDEO
Plane Crash : अलीकडे विमान अपघातांची संख्या वाढत चालली आहे.आज एक खूप विचित्र विमान अपघात झाला. एका कार्गो म्हणजे मालवाहू विमान धावपट्टीवरुन घसरलं व थेट समुद्रात जाऊन कोसळलं.

अलीकडे विमान अपघातांची संख्या वाढत चालली आहे. हवाई प्रवास हा सुरक्षित मानला जातो. मात्र मागच्या काही महिन्यात प्रवासी विमान अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. जून महिन्यात भारतात एक भीषण विमान अपघात घडला होता. गुजरात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळलं होतं. यात 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला. आज हाँगकाँगमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. सोमवारी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कार्गो म्हणजे मालवाहू विमान धावपट्टीवरुन घसरलं व थेट समुद्रात जाऊन कोसळलं. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हे विमान तुर्कीची मालवाहतूक करणारी एअरलाइन कंपनी एसीटीचं होतं. स्थानिक मीडियाने हे वृत्त दिलं आहे. एमिरेट्सच हे विमान EK9788, बोइंग 747-481, स्थानिकवेळेनुसार, जवळपास 03:50 मिनिटांनी (19:50 GMT) दुबईवरुन येत होतं. धावपट्टीवर एका वाहनाशी या विमानाची टक्कर झाली.
दोघांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवलं
विमानतळावरील दोन ग्राऊंड स्टाफ समुद्रात पडले असं सिविल एविएशन डिपार्टमेंटकडून सांगण्यात आलं आहे. समुद्रात पडलेल्या ग्राऊंड स्टाफमधील दोघांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवलं, तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक मिडिया तसच सार्वजनिक प्रसारक आरटीएचके यांनी पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. विमानातून प्रवास करणारे चालक दलाच्या चार सदस्यांचे प्राण वाचले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर्स तैनात
ज्या रनवे वर ही दुर्घटना घडली तो बंद करण्यात आला आहे. पण विमानतळावरील दोन धावपट्ट्या सुरु आहेत. एअरपोर्ट प्रशासन या प्रकरणात लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे. हाँगकाँगच्या सरकारी उड्डाण सेवेने प्रभावित रनवे च्या वर हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत,स्थानिक मिडिया रिपोर्ट्समधून ही माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडच्या बोटी सुद्ध मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.
Hong Kong Airport Incident! Early today (20th), a cargo flight from Dubai to Hong Kong collided with a ground support vehicle and plunged into the sea, resulting in the deaths of two people—the passenger and driver of the ground support vehicle. #HongKong #PlaneCrash pic.twitter.com/zrSiGYErvX
— Bruce Lee (@sxrbggpp) October 20, 2025
विमानतळावरील हा दुर्मिळ अपघात
विमानतळ प्राधिकरणाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी कमीत कमी 11 कार्गो फ्लाइट्स रद्द करण्यात आली आहेत. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हा दुर्मिळ अपघात आहे. या विमानतळाचा सुरक्षा रेकॉर्ड खूप चांगला आहे. दुबईवरुन येणारं हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी जवळपास 3.50 मिनिटांनी हाँगकाँग विमानतळावर उतरलं.
