Nimisha Priya : जे हूती अमेरिकेच ऐकत नाहीत, त्यांनी एका भारतीयाच्या शब्दाला कसा मान दिला? पडद्यामागची गोष्ट
Nimisha Priya : रेड सी मध्ये हे हूती बंडखोर व्यापारी जहाजांवर मिसाइल, ड्रोनद्वारे हल्ला करतात. ते अमेरिकेच्या सुद्धा नियंत्रणात नाहीत. तिथे ते एका भारतीयाचं कसं ऐकले. भारतीय नर्स निमिषा प्रियावर असलेलं फाशीच संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही.

केरळची नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनची राजधानी सनाच्या तुरुंगात फाशी होणार होती. पण बरोबर एकदिवस आधी 15 जुलै रोजी येमेनच्या न्यायालायने अचानक फाशीच्या शिक्षेला ब्रेक लावला. निमिषा प्रिया जिथे अडकली आहे, हा तोच भाग आगे, जो हुती बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्या हुतींसोबत डील करणं अमेरिकेसाठी सुद्धा चॅलेंजिंग असतं. ANI रिपोर्टनुसार भारत सरकारने अलीकडेच पीडित कुटुंबासोबत म्यूचुअल एग्रीमेंट करण्याच्या प्रयत्नांना वेग दिला. येमेनी कायद्यानुसार ब्लड मनी दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा टळू शकते. त्यासाठी 94 वर्षीय कंथापुरम एपी अबूबक्कर मुसलियार यांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाना आता यश येताना दिसतय. त्यांना भारतात ‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’ म्हटलं जातं.
भारत सरकारच्या अधिकृत प्रयत्नांसोबत मुसलियार यांनी जे केलं, ते कुठल्याही सरकार तंत्रासाठी अशक्य होतं. अबूबक्कर मुसलियार यांनी थेट येमेनच्या धार्मित शक्तींशी संवाद साधला. त्यांनी येमेनचे सूफी इस्लामिक विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी संपर्क साधला. शेख उमर यांनी तात्काळ आपलं धार्मिक आणि सामाजिक नेटवर्क सक्रीय केलं. निमिषावर ज्याच्या हत्येचा आरोप आहे, त्या तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाशी, न्यायाधीश आणि कबायली नेत्यांशी चर्चा सुरु केली.
हीच मोठी गोष्ट
हबीब उमर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर येमेनमध्ये एक इमर्जन्सी बैठक झाली. त्यात सना क्रिमिनल कोर्टाचे चीफ जज, पीडित कुटुंब, सरकारी अधिकारी आणि कबीलाचे प्रमुख होते. हा तोच येमेन आहे, जिथे हूती बंडखोर रोज रेड सी मध्ये व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि मिसाइल्स डागतात. तिथे भारताच्या सांगण्यावरुन एक फाशी टाळण्यासाठी मोठी बैठक व्हावी हीच मोठी गोष्ट आहे. महदी कुटुंबाने ब्लड मनीवर चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना अजून थोडा वेळ हवा आहे. म्हणजे फाशीला सध्या स्थगिती मिळालीय.
हस्तक्षेपाला मर्यादा का?
भारत सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलय की, ते सर्व शक्य ते प्रयत्न करताहेत. येमेनमधील वर्तमान स्थिती आणि हूती कंट्रोलमुळे हस्तक्षेपाला मर्यादा आहेत. मात्र, तरीही भारतीय धर्मगुरुच्या मध्यस्थतेमुळे जो दरवाजा उघडलाय, त्याने अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. सूफी स्कॉलर हबीब उमरचे प्रतिनिधी पुन्हा एकदा महदीच्या कुटुंबाला भेटतील. म्हणजे चर्चेमधून कुठला अंतिम तोडगा निघेल. पीडित कुटुंबाने ब्लड मनी स्वीकारली तर निमिषाचे प्राण वाचतील.
