Explained : कतर हल्ला फसला पण इस्रायलला मानावच लागेल, यात अमेरिकन टेक्नोलॉजीची मोठी हार, कसं ते समजून घ्या
Israel Attack On Qatar : इस्रायलने चालू आठवड्यात कतरवर हल्ला केला. ही एक मोठी घटना आहे. कारण आखातामधील कतर एक प्रभावशाली देश असून अमेरिकेचा विश्वासू मित्र आहे. कतरच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेवर आहे. इस्रायलने थेट कतरवर हल्ला करुन अमेरिकेच्या विश्वासाला तडा दिला ही गोष्ट वरवरची आहे. खरंतर इस्रायलच्या या कारवाईमध्ये अमेरिकेचा मोठा पराभव आहे.

आखाती देशांमध्ये कतर एक छोटासा देश आहे. पण प्रचंड श्रीमंत देश आहे. त्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर गर्व आहे. जगातील अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस (अल-उदीद) कतरमध्येच आहे. तिथून अमेरिका संपूर्ण मिडिल ईस्टवर नजर ठेवते. अत्याधुनिक रडार सिस्टिम, पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टिम यामुळे आतापर्यंत कतर सर्वात सुरक्षित देश समजला जात होता. पण नुकत्याच झालेल्या इस्रायलच्या एअर स्ट्राइकने या विश्वासाला तडा गेला आहे. इस्रायलने मंगळवारी कतरची राजधानी दोहामध्ये जवळपास 10 हवाई हल्ले केले. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात कतरच्या एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. त्यामुळे बाहेरुन वाटते तितकी कतरची सुरक्षा मजबूत आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कतरमध्ये असलेला अमेरिकी सैन्याचा अल-उदीद एअरबेस कणा मानला जातो. इथे हजारो अमेरिकी सैनिक तैनात आहेत. अल-उदीद एअरबेसवर अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमानं, ड्रोन आणि कमांड सिस्टिमद्वारे पूर्ण क्षेत्रावर कंट्रोल केला जातो. त्याशिवाय कतरने अब्जावधी डॉलर खर्च करुन अर्ली-वार्निंग राडार सिस्टिम आणि पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टिम उभी केलीआहे.टेक्नोलॉजीच्या दृष्टीने कतर आखातामधील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. त्यामुळे कतरची राजधानी दोहाला आंतरराष्ट्रीय चर्चा आणि गुप्त बैठकांसाठी निवडलं जातं.
त्याने सगळं चित्रच बदलून टाकलय
पण या आठवड्यात जे झालं, त्याने सगळं चित्रच बदलून टाकलय. इस्रायलने दोहाच्या मध्यभागी एका रहिवाशी इमारतीवर बॉम्बफेक केली. इस्रायलच्या म्हणण्यांनुसार, तिथे हमासचे वरिष्ठ नेते होते. कतर हमास आणि इस्रायलमध्ये सीजफायर डील करण्याचा प्रयत्न करत असताना हा हा हल्ला झाला आहे.
यातच अमेरिकेची मोठी हार
आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व त्या शहारत झालं, जिथे अमेरिकी रडार, मिसाइ आणि एअर डिफेन्स सिस्टिम 24 तास अलर्ट मोडवर असते. इस्रायली फायटर जेट्स एक मोठा प्रवास करुन दोहापर्यंत पोहोचले. तिथे अमेरिकेची अद्ययावत यंत्रणा असताना सुद्धा दोहावर बॉम्ब वर्षाव केला. ही खूप मोठी बाब आहे. कारण इस्रायली फायटर जेट्स येतायत हे अमेरिकी सिस्टिमला कळू नये, यातच त्यांची हार आहे.
अन्य आखाती देशांचा अमेरिकेवर विश्वास कसा राहिलं?
एकप्रकारे इस्रायलने अमेरिकेच्या टेक्नोलॉजीवर केलेली ही मात आहे. भले इस्रायलला त्यांचं अपेक्षित उद्दिष्टय साध्य करता आलं नाही. पण त्यांचं तिथपर्यंत पोहोचणच मोठी बाब आहे. या घटनेमुळे अमेरिकच्या सुरक्षेच्या आश्वासनावर विश्वास ठेवता येईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेचा बेस असलेला कतरच सुरक्षित नसेल, तर अन्य आखाती देशांचा अमेरिकेवर विश्वास कसा राहिलं?.
