प्लेन हायजॅक नेहमीचंच, पण ट्रेन? गेल्या 200 वर्षात ट्रेन कितीवेळा हायजॅक?; पाकिस्तानात जे घडलं ते…
Pakistan Train Hijack : पाकिस्तानातील बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. ही ट्रेन अपहरणाची घटना अत्यंत दुर्मिळ आहे. प्लेन अपहरणाच्या तुलनेत ट्रेन अपहरण अधिक कठीण असते. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानाच्या बलूचिस्तानमध्ये मंगळवारी एक ट्रेन हायजॅक (Pakistan Train Hijack) करण्यात आली. जाफर एक्सप्रेस कोटाहून पेशावरला जात असताना बॉम्बने ट्रेन उडवण्यात आली. त्यामुळे ट्रेन भुयारात थांबली. हल्लेखोरांनी आधी बॉम्ब फेकले त्यानंतर या ट्रेनवर ताबा मिळवला. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) नावाच्या संघटनेने ही ट्रेन हायजॅक केली आहे. तसं पाहता ट्रेन हायजॅकची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. नेहमी विमान अपहरणाच्या घटना आपण ऐकल्या आहेत. 1931मध्ये पहिल्यांदा प्लेन हायजॅक करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत 1000हून अधिक प्लेन हायजॅक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पण एखाद्या ट्रेनला हायजॅक करण्याची घटनाच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. रेल्वेचा इतिहास 200 वर्ष जुना असून यात ट्रेन हायजॅक करण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. ट्रेन हायजॅक करणं का अशक्य आहे? त्यावरच टाकलेला हा प्रकाश. ...