World War : युक्रेनबाहेर पहिला वार झालाय, त्यामुळे कुठल्याही क्षणी भडकू शकतं तिसरं जागतिक महायुद्ध, जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी
World War : मागच्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. पण आता युक्रेनबाहेर पहिला वार झालाय. रशियावर एक गंभीर आरोप लावण्यात आला आहे. रशियावर कुठलाही हल्ला झाल्यास ते तिसऱ्या महायुद्धाला कारण ठरु शकतं. सध्या युरोपमध्ये प्रचंड तणाव आहे.

व्लादीमीर पुतिन यांच्या रशियन सैन्यावर नाटोच्या सदस्य देशावर हल्ला केल्याचा आरोप होतोय. रशियन सैन्याने 415 ड्रोन्स आणि 40 पेक्षा जास्त मिसाइल डागून पोलंडवर हवाई हल्ला केला. पहिल्यांदाच रशियावर नाटो संघटेतील देशावर हल्ल्याचा आरोप झालाय. पोलंड हा नाटोचा सदस्य आहे. नाटो समूहातील कुठल्याही देशावरील हल्ला हा संपूर्ण नाटो समूहावर हल्ला मानला जातो. मागची तीन वर्ष रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हा युद्धाच्या विस्ताराचा संकेत आहे. पुतिन यांनी नाटो आणि अमेरिकेला इशारा दिलाय की, रशिया आता थांबणार नाही. रशियाच्या या हल्ल्यानंतर पोलंडला त्यांचा विमानतळ बंद करावा लागला अशी माहिती आहे.
बातम्यांनुसार, ड्रोन हल्ल्यानंतर पोलंडला आपल्या फायटर जेट्सना मोर्चा सांभाळण्यासाठी पाठवावं लागलं. इमर्जन्सीमध्ये नाटोचे फायटर जेट्स पोलंडच्या एअरस्पेसमध्ये तैनात करण्यात आले. दाव्यानुसार, रशियाचे अनेक ड्रोन्स पाडण्यात आले. पण काही ड्रोन्स रोखता आले नाहीत. पोलंडच्या सैन्याने आपल्या एअरस्पेसच्या सुरक्षेसाठी नाटोचं एअर कमांड आणि नेदरलँडसचे आभार मानलेत.
रशियाची प्रतिक्रिया काय?
दुसरीकडे पोलंडवर झालेल्या या हवाई हल्ल्यावर रशियाची प्रतिक्रिया आली आहे. युरोपियन यूनियन आणि नाटोकडून तथ्यहीन आरोप केले जातायत असं रशियाने म्हटलय. पण ही गोष्ट खरी आहे की, रशियाच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी पोलंडवर हल्ल्याची धमकी दिली होती.
एअरस्पेसमध्ये घुसणं अजिबात मान्य नाही
फ्रान्सने तर रशियाविरोधात खुल्या युद्धाची घोषणा केली आहे. नाटो देश आता रशियावर पलटवार करण्यासाठी तयार आहेत. युक्रेनवर हल्ला करताना रशियन ड्रोन्सनी पोलंडच्या एअरस्पेसमध्ये घुसणं अजिबात मान्य नाही. मी याचा कठोर शब्दात निषेध करतो. रशियाच्या या आक्रमकतेला समाप्त करण्याचं आवाहन करतो. मी लवकरच नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्याशी बोलणार आहे.
तिसऱ्या जागतिक महायुद्धासाठी तेच कारण ठरु शकतं
रशियाच्या हल्ल्याला पोलंडने नाटोवरील हल्ला म्हटलं आहे. आता आर्टिकल-4 नुसार सर्व नाटो देशांची बैठक होईल. या बैठकीत ठरेल की, रशियाचा ड्रोन हल्ला नाटोवरील हल्ला होता की नाही?. रशियाच्या हल्ल्यामुळे नाटो देशांच्या सुरक्षेला धोका आहे की नाही?. हा हल्ला सुरक्षेला धोका आहे, असं मानण्यात आलं, तर पोलंडवरील रशियन हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं ते ठरवलं जाईल. रशियावर प्रतिहल्ला झाल्यास तिसऱ्या जागतिक महायुद्धासाठी तेच कारण ठरु शकतं.
