AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US : काही तासात इराणने मारली मोठी पलटी, भारतासह सगळ्या जगाला धक्का

Iran-US : सध्या सगळ्या जगाचं लक्ष मध्य पूर्वेकडे लागलं आहे. दर तासाला वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. जे बोललं जातय तसं काहीच होत नाहीय. निर्णय जाहीर होतात. पण त्यावर अमलबजावणी होत नाही. यामुळे गोंधळाची स्थिती आहे.

Iran-US : काही तासात इराणने मारली मोठी पलटी, भारतासह सगळ्या जगाला धक्का
Iran-US
| Updated on: Apr 18, 2026 | 3:16 PM
Share

इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पुन्हा एकदा बंद केलं आहे. जो पर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरु राहिल, तो पर्यंत हॉर्मुज स्ट्रेट उघडणार नाही अशी इराणने भूमिका घेतली आहे. अमेरिकन कारवाईच्या विरोधात ही Action घेतली आहे. इराणने शुक्रवारी हॉर्मुज स्ट्रेट उघडायला मान्यता दिली होती. सीजफायर दरम्यान स्ट्रेट ऑफ हॉर्मुज व्यापारी जहाजांसाठी खुलं राहिलं असं सुद्धा म्हटलं होतं. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. इराण त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल जो पर्यंत तडजोड करणार नाही, तो पर्ंत ही नाकाबंदी सुरु राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. करार झाला नाही तर अमेरिका पुन्हा हल्ले करेल असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणकडे जो संवर्धित युरेनियमचा साठा आहे, तो मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलय.

इराणच्या इस्लामी रिवॉल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेवर समुद्री दरोडेखोरीचा आरोप केला आहे. अमेरिकी नाकाबंदी ही समुद्री लुटीसारखी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून पर्शियन गल्फमधून काही तेल टँकर्सनी जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला. काल इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज व्यावसायिक जल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुलं असल्याचं जाहीर केलं. आज पाच ग्रीक आणि भारतीय तेल टँकर्सना इराणी नौदलाने माघारी पाठवून दिलं.

अनेक देशात तेल संकट

हॉर्मुज स्ट्रेट पूर्णपणे उघडलेलं नाही असं इराणने आधी सांगितलं होतं. सीजफायर दरम्यान काटी अटी-शर्तींवर हा रस्ता उघडल्याच इराणच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं होतं. सैन्य जहाजं आणि शत्रुशी संबंधित जहाजांना इथून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज इराण आणि ओमानमध्ये असलेला अरुंद समुद्री मार्ग आहे. इथून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते. इराणने हॉर्मुजची वाट अडवून धरल्यामुळे अनेक देशात तेल संकट निर्माण झालं आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

इराणसोबत बुधवारपर्यंत करार झाला नाही, तर अमेरिका पुन्हा हवाई हल्ले सुरु करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “सध्याचं सीजफायर वाढवलं सुद्धा जाऊ शकतं आणि संपुष्टात सुद्धा येऊ शकतं. कदाचित मी सीजफायर पुढे वाढवणार नाही. पण इराणी बंदराभोवती नाकेबंदी सुरुच राहिलं. आम्हाला पुन्हा बॉम्ब हल्ले करावे लागू शकतात” असं ट्रम्प म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...