2021 मध्येही कोरोना काही थांबेना, बँकॉकमध्ये शाळा आणि बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद

देशात शुक्रवारी संक्रमणाची 279 नवीन प्रकरणं नोंदली गेली होती. यामध्ये दोन लोकांचा मृत्यूही झाला.

2021 मध्येही कोरोना काही थांबेना, बँकॉकमध्ये शाळा आणि बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद

नवी दिल्ली : 2020 संपून आता 2021 ला सुरुवात झाली तरी कोरोना (Corona) काही थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, थायलंडची राजधानीमध्ये (Thailand) कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शाळा, उद्योगधंदे आणि अनेक ठिकाणं पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत. देशात शुक्रवारी संक्रमणाची 279 नवीन प्रकरणं नोंदली गेली होती. यामध्ये दोन लोकांचा मृत्यूही झाला. (in bangkok schools and local markets are ordered to close due to corona)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकॉकसह सात प्रांतांमध्ये रेड झोन घोषित करण्यात आला आहे. तिथे बॉक्सिंग स्थळे, करमणुकीची ठिकाणं, जिम आणि स्थानिक बाजारपेठाही कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त रेस्टॉरंटमधून ऑनलाईन डिलेव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत हे निर्बंध लागू राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशात संसर्गाची 180 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. कोरोना केंद्राचे प्रवक्ते डॉ. तवीसिल्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्याकडे 60 लाख लसीच्या नव्या उपकरणासाठी संपर्क साधण्यात येत आहे.

खरंतर, कोरोनाबाबत 2021 मध्ये दिलासा देणार बाब म्हणजे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गावर लस आली आहे. सगळ्यात आधी ब्रिटनने फायझर आणि बायोनोटॅक या लसींना मान्यता देण्यात आली असून लसीकरणाला सुरुवातही करण्यात आली आहे. आतापर्यंत अमेरिका, चीन, सौदी अरेबिया, अर्जेंटिनासह अनेक देशांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. (in bangkok schools and local markets are ordered to close due to corona)

संबंधित बातम्या – 

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?

कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात आणखी चार रुग्ण, आतापर्यंत 29 संक्रमितांची नोंद

(in bangkok schools and local markets are ordered to close due to corona)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI