India-Israel FTA : तेल अवीव येथून आली मोठी बातमी, भारत आणि इस्रायलमध्ये ऐतिहासिक करारावर मोहर
इस्रायलमधील तेल अवीव येथे भारत-इस्रायल यांच्या आज मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करण्यात आली. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे इस्रायली समकक्ष नीर बरकत यांनी या करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध नव्या उंचीवर पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

India-Israel Free Trade Agreement: भारत आणि इस्रायल यांच्यातील जुनी दोस्ती आता नव्या व्यावसायिक अध्यायात प्रवेश करत आहेत. तेल अवीवमध्ये आज भारत आणि इस्राईलच्या संबंध आणखी पुढे नेणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. ज्या मुक्त व्यापार कराराची (FTA) बराच काळ वाट पाहिली गेली त्यातील अटी आणि शर्तींना अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलचे नीर बरकत यांच्याशी सामजंस्य करारावर सह्या केल्या.
तेल अवीवमध्ये काय झाले खास?
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सध्या 60 सदस्यीय भारतीय व्यापारी शिष्ठमंडळासह इस्राईलच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा मुख्य अजेंडा प्रस्तावित मुक्त व्यापार करार ( एफटीए ) च्या प्रगतीचा आढावा करणे हा होता. आणि बुधवारी तेल अविव येथून बातमी आली असून ती खूपच सकारात्मक आहे.
आता दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी मिळून सामंजस्य कराराच्या अटी अंतिम केल्या आहेत. आणि अधिकृतपणे त्यावर सह्याही केल्या आहेत. या दरम्यान पीयूष गोयल यांनी इस्राईलची उद्योग मंत्री नीर बरकत यांच्यात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि नावीन्यपूर्णता (Innovation) वाढवण्यासाटी नव्या मार्गांवर देखील चर्चा झाली. हा सामंजस्य करार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला नवा वेग देण्याचे काम करणार आहे.
14 वर्षांची प्रदीर्घ प्रतिक्षा
भारत आणि इस्राईलच्या दरम्यानच्या मुक्त व्यापार करारा संदर्भात गेल्या मे २०१० पासून बोलणी सुरु होती. आतापर्यंत दोन्ही देशात आठ वेळा प्रदीर्घ बैठका झाल्या होत्या. मध्यंतरी काही वेळा लांबण लागली होती. परंतू ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा दोन्ही पक्षांमार्फत बोलणी सुरु झाली चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली.
हा करार अशा काळात झाला आहे जेव्हा व्यापारी आकडेवारीत थोडी घसरण झाली होती. आर्थिकवर्षे २०२४-२५ दरम्यान भारताने इस्राईलला होणारी निर्यात गेल्या वर्षीच्या ४.५२ अब्ज डॉलरच्या तुलनेत घटून २.१४ अब्ज डॉलर राहीली होती. तर आयातीत कपात नोंदली गेली होती. अशात एफटीएच्या अटींवर मोहर लागल्याने दोन्ही देशांचा व्यापार पुन्हा रुळांवर येऊन नव्या उंचीवर पोहचण्यासाठी हा बूस्टर डोस साबित होईल.
हिरे दागिन्यांपासून ते हायटेक तंत्रज्ञान …काय बदलेल ?
भारत आशियात इस्राईलचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पारंपारिकपणे आपला व्यापार मुख्यत:हिरे , पेट्रोलियम पदार्थ आणि रसायने यावर अवलंबून होता. परंतू बदलत्या काळाप्रमाणे आता इलेक्ट्रॉनिक मशिनरी, हाय-टेक प्रोडक्ट्स, दूर संचार प्रणाली आणि मेडिकल उपकरणे यासारख्या आधुनिक क्षेत्रातही देवाण-घेवाण वाढणार आहे.
भारतातून इस्राईलला मोती, रत्ने, हिरे, मोटार वाहन डिझेल, मशिनरी, टेक्सटाईल, वस्रे आणि कृषी उत्पादने सारख्या पदार्थांची मोठी निर्यात होत होती. आता या सामंजस्य कराराने भारतीय उत्पादनांची आणखी पोहच वाढणार आहे. ज्यामुळे भारतीय निर्माण कंपन्या आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
