Powerfull Country : जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

वर्ष 2020 मध्ये सर्वात शक्तीशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे (India out in powerful country list).

Powerfull Country : जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

मुंबई : वर्ष 2020 मध्ये सर्वात शक्तीशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे (India out in powerful country list). प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. पण यावर्षी भारताला दोन अंकाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2019 च्या यादीत भारत जगातील शक्तीशाली देशांच्या यादीत होता. पण यावर्षी कोरोना विषाणूमुळे भारत या यादीतून बाहरे झाला आहे (India out in powerful country list).

सिडनीतील लोवी इंस्टीट्यूटच्या अशिया पॉवर इंडेक्स 2020 नुसार, 2019 मध्ये भारताचा स्कोअर 41.0 होता. तो आता 2020 मध्ये घटून 39.7 झाला आहे. या लिस्टमध्ये ज्या देशाचा स्कोअर 40 किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यालाच जगातील शक्तीशाली देश मानला जातो. गेल्यावर्षी भारताचा या यादीत समावेश होता. पण यावर्षी थोड्या अंकानी भारत यादीतून बाहेर झाला आहे.

कोरोनामुळे भारताचे नुकसान

लोवी इंस्टीट्यूच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “आशियातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता मध्य शक्तीशाली देशांच्या यादीत गेला आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा देश पुन्हा या शक्तीशाली देशांच्या यादीत समावेश होऊ शकतो. इंडो पॅसिफिकच्या सर्व देशांमध्ये भारताने कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरवून बसला आहे.”

चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर

“भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे. काहीवर्षांनी भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकू शकतो. पण भारतीय समाजाने कोरोना विषाणूच्या संकटाने दोन्ही देशातील शक्तीची असमानता वाढवली आहे. तसेच या वर्षाच्या शेवटपर्यंत भारत, चीनचे एकूण आर्थिक उत्पादन केवळ 40 टक्केपर्यंत पोहचणार, तर 2019 च्या उत्पादनाच्या 50 टक्केपर्यंत यंदाचे आर्थिक उत्पादन होऊ शकते”, असंही लोवी इंस्टीट्यूटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनिकाचं Covid-19 औषध बनवण्यावर संशोधन, 18 लाख रुपये जिंकले

Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *