Operation Sindoor : पाकड्यांना दहशतवाद्यांचा पुळका, भारताने हवा काढली तरी जगासमोर रडीचा डाव
भारताने पहलगाम हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानला चकवा देत अचानक ही कारवाई करण्यात आल्याने दहशतवादी नेटवर्कचे मोठे नुकसान झाले. 22 एप्रिलपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन रणनीती आखली होती.

पाकड्यांच्या घरात घुसून भारताने अद्दल घडवली. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांचे तळ भारताच्या कारवाईमुळे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. भारताने जे सांगितले ते दाखवून दिले आहे, या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. तसेच आता पाकिस्तान पुढे काय डावपेच आखणार, याकडे देखील भारताचं लक्ष असेल.
भारताने हल्ला करण्याची हिंमत करू नये, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, अशी वक्तव्ये पाकिस्तानचे नेते वारंवार करीत होते. पहलगाम हल्ल्यानंतर सिंदूर ऑपरेशन अंतर्गत दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, या तळांवरून भारतावर हल्ले करण्याची योजना आखली जात होती, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली. भारताने अतिशय हुशारीने हा हल्ला केला असून पाकिस्तानला पुन्हा एकदा चकवा दिला आहे.
पाकिस्तानला कसा चकवा दिला?
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणा भारताकडून पहिल्याच दिवशी करण्यात आली. पण ते केव्हा आणि कसे केले जाईल, याची माहिती देण्यात आली नाही. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेत आहेत.
22 एप्रिल रोजी सुमारे दोन आठवडे उलटून गेल्यानंतर 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल घेण्यात येणार असल्याचे भारत सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. ज्यानंतर पाकिस्तानला खात्री पटली होती की हा हल्ला 7 मे नंतरच होईल, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानला चकवा देत 7 मे पासून पाकिस्तानला धक्का दिला आहे.
रशियाच्या विजय दिनानंतर हल्ल्याची भीती
पाकिस्तानमध्ये भारताच्या हल्ल्याला दुजोरा मिळाला असला तरी दुसरीकडे रशियाच्या विजयदिनानंतर भारत प्रत्युत्तर देईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाला जाणार होते. या सर्व बातम्यांमध्ये भारताने पाकिस्तानला अडकवून ठेवले आणि 7 मे रोजी अचानक हल्ला केला.
पाकिस्तानात किती नुकसान झाले?
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या तळांवर हा हल्ला करण्यात आला असून यामध्ये 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात 50 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर रस्त्यावर भीतीचे वातावरण असून अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
