AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sco Summit 2025 : भेटणं तर दूर, मोदींनी त्या दोघांकडे पाहिलं सुद्धा नाही, भारताने SCO च्या स्टेजवर दाखवला स्वाभिमान

Sco Summit 2025 : सध्या शांघाय सहकार्य परिषद SCO ची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेसाठी चीनला गेले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मोदी अनेक परदेशी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण शांघाय सहकार्य परिषद SCO च्या स्टेजवर एक घटना घडली. त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. चीनच्या तियानजिनमध्ये सर्व SCO सदस्य एका मंचावर उपस्थित होते.

Sco Summit 2025 : भेटणं तर दूर, मोदींनी त्या दोघांकडे पाहिलं सुद्धा नाही, भारताने SCO च्या स्टेजवर दाखवला स्वाभिमान
PM Narendra Modi
| Updated on: Sep 01, 2025 | 11:22 AM
Share

शांघाय सहकार्य परिषद SCO मध्ये भारताने कूटनिती दाखवली आहे. त्याची खूप चर्चा सुरु आहे. चीनच्या तियानजिनमध्ये सर्व SCO सदस्य एका मंचावर उपस्थित होते. त्यानंतर ग्रुप फोटो सेशन झालं. फोटो सेशननंतर पीएम मोदी दोन देशांच्या प्रमुखांना सोडून सर्व नेत्यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन यांच्यापासून लांबच राहिले.

फोटो सेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान, इजिप्तचे पीएम मुस्तफा मदबौली, बेलारूसच्या राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांची विचारपूस केली. पण शहाबाज आणि एर्दोगन यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी बिघडले आहेत. तुर्कीने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानची मदत केली होती. त्याचा राग भारतीयांच्या मनात कायम आहे.

मोदींनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही

एकूणच चीनच्या तियानजिनमध्ये ग्लोबल डिप्लोमेसीचा एक नवीन अध्याय पहायला मिळाला. पीएम मोदी, व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग तिघे एकामंचावर एकत्र दिसले. या भेटीनंतर ट्रम्प यांचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे. फोटो सेशनच्यावेळी मंचावर तुर्किए आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा उपस्थित होते. पण त्यांना भेटणं तर दूर राहिलं, पण पीएम मोदींनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही.

त्यामुळे भारतीयांच्या मनात राग

भारत-पाकिस्तानचे संबंध जगजाहीर आहेत. पण कधीकाळी तुर्की सोबत भारताचे चांगले संबंध होते. पण सध्या ते संबंध खराब झाले आहेत. या मागच कारण आहे, पाकिस्तान. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. याला तुर्कीने विरोध केलेला. चार दिवस चाललेल्या लढाईत तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन्ससह अन्य शस्त्रास्त्र दिली. त्यामुळेच भारतात तुर्की विरोधात प्रचंड रोष आहे.

आयात रोखली

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-तुर्की संबंधात तणाव वाढला. भारतात तुर्कीला बॉयकॉट करण्याची मोहिम सुरु झाली. लोकांनी तुर्कीच्या वस्तुंवर बहिष्कार घातला. व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून सफरचंद, मार्बल आणि अन्स सामानाची आयात रोखली.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.