AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे कदापिही सहन करणार नाही, भारत भडकला, थेट खडेबोल सुनावत..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत संकट आहे. मोठे हल्ले जहाजांवर केले जात आहेत. 13 मे रोजीच भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यानच भारताने थेट याविरोधात भूमिका घेतली आहे.

हे कदापिही सहन करणार नाही, भारत भडकला, थेट खडेबोल सुनावत..
UN conference
| Updated on: May 17, 2026 | 10:54 AM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे. होर्मुज खाडीत जहाजांवर हल्ला करून जहाज बुडवली जात आहेत. यादरम्यानच भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर होर्मुज खाडीत होणाऱ्या जहाजांवरील हल्ल्यावर जोरदार टीका केली. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट करून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवला. हे हल्ले कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारले जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. सुरक्षित मार्ग जहाजांना देत आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच दोन जहाज बुडवण्यात आले. ओमान समुद्रहद्दीजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला 13 मे 2026 रोजी करण्यात आला. हे जहाज सोमालिया येथून भारताच्या दिशेने येत होते. ओमानकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश मिळाले. मात्र, भारतीय जहाजावर नक्की कोणी हल्ला केला, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

भारताने त्यावेळीच या हल्ल्याचा जोरदार निषेध केला. धक्कादायक बाब म्हणजे हे तिसरे जहाज आहे, ज्याच्यावर भारतीय ध्वज असतानाही हल्ला करण्यात आला. होर्मुज खाडीच्या आसपास भयंकर संकट आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. तेव्हापासून होर्मुज खाडी बंद आहे.

होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर होर्मुज खाडीत जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात भारताने जाहीर भूमिका घेत हे सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. होर्मुज खाडीत तणाव इतका जास्त वाढला आहे की, थेट जहाजांवर हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी ठप्प आहे.

अमेरिकेला हे युद्ध 4 आठवडे चालेल असे वाटत होते. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धाला 12 आठवडे होत आहेत. मात्र, दोन्ही देश मागे हटताना दिसत नाहीत. या युद्धात जागतिक बाजारावर परिणाम होत आहे. युद्ध जर काही दिवस असेच चालत राहिले तर जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. इराणकडून काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला एक प्रस्ताव देण्यात आला. मात्र, तो प्रस्ताव अमेरिकेने नाकारला.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक