AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने दिला अमेरिकेला जोरदार झटका, ट्रम्प महाशय हात चोळत बसले !

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही भारताची मजबूत अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ यामुळे भारतावर या टॅरिफ बॉम्बचे मोठे नुकसान झालेले नाही.

भारताने दिला अमेरिकेला जोरदार झटका, ट्रम्प महाशय हात चोळत बसले !
Donald trump and pm modi
| Updated on: Nov 04, 2025 | 8:21 PM
Share

मोदी सरकारने अमेरिकेने जोरदार टॅरिफ लावूनही भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी जीएसटी दरात कपात केली, त्यामुळे सणासुदीच्या दिवसात ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी खरेदी केल्याने घरगुती बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम जाणवला नाही. सणासुदीत भारतीय बाजारात सहा लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बिजोमच्या आकडेवारीनुसार २२ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सणासुदीच्या खर्चात सुमारे ८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले की या दरम्यान विक्री सुमारे ६ लाख कोटी रुपयांपर्यंत ( ७६.६ अब्ज डॉलर ) पर्यंत पोहचली आहे. ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फर्निशिंग आणि मिठाई सारख्या वस्तूंची मागणी सर्वाधिक राहिली आहे.

कार आणि ट्रॅक्टरची विक्रीत बंपर वाढ

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या कंपन्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने नवरात्र आणि धनतेरसच्या दरम्याने १ लाखाहून अधिक कारची डीलिव्हरी केली, तर महिंद्रने ट्रॅक्टरची विक्रीत २७ टक्के वृद्धी झाली आहे. हुंडई मोटरच्या विक्रीत धनतेरसला गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे. मारुती डिलरशिप्सवर ग्राहक इतके खूश झाले की रविवारीही उत्पादन जारी ठेवावे लागले.

किचन-घरगुती साहित्याच्या विक्रीत वाढ

कोटक महिंद्र बँक आणि एसबीआय कार्ड्स एण्ड पेमेंट्स सारख्या फायनान्शियल फर्मच्या आकड्यानुसार किचन कॅटेगरीत देखील खरेदीसाठी झुंबड उडाली. प्रेशर कुकर आणि अन्य घरगुती उत्पादनांवर टॅक्स कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळाला.

अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम नगण्य

एप्रिलमध्ये अमेरिकेच्या टॅरिफच्या कारणांनी सुरुवाती रिकव्हरी थांबली होती. परंतू २२ सप्टेंबर २०२५ पासून जीएसटी दरातील कपातीनंतर बाजारातून रिकव्हरी केली. यावरुन हे सिद्ध होते की घरगुती उपायांनी आर्थिक उलाढालीला मजबूती दिली जाऊ शकते. तरीही आर्थिक आव्हाने अजूनही आहेत. मंद उत्पन्न वाढ आणि कमकुवत श्रम बाजार यांचा दीर्घकालीन ट्रेंडवर अजूनही परिणाम होऊ शकतो.

सामंतांच्या भेटीमुळे बडतर्फी? बडतर्फीनंतर चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया
सामंतांच्या भेटीमुळे बडतर्फी? बडतर्फीनंतर चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया.
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा.
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.