AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी रचला इतिहास, अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी भरारी

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान एसर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाइम (50 तास, 40 मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी रचला इतिहास, अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी भरारी
| Updated on: Jun 06, 2024 | 12:47 PM
Share

भारतीय वंशाच्या अंतराळवीर यांच्या नावावर आणखी एक विक्रम रचला गेला आहे. सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी ( 5 जून) अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं. अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिला महिला ठरल्या आहेत. 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी “बुच” विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या पहिल्या सदस्य बनून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.

बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट (सीएफटी) नावाचे हे मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या रुपात सुरू करण्यात आले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जर हे मिशन यशस्वी ठरले तर अंतराळवीरांना कक्षेतील लॅबमध्ये घेऊन जाणे आणि तेथून आणणारे स्टारलाइनर हे स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचे दुसरे खासगी अवकाशयान ठरेल.

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान एसर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाइम (50 तास, 40 मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता.

उड्डाण केल्यानंतर स्टारलायनर कॅप्सूल हे सुमारे 26 तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉक करण्याचा प्रयत्न करेल. ज्यामध्ये सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टसाठी 500 पौंडांपेक्षा अधिक कार्गो असतील.

एक आठवडा अंतराळात थांबणार सुनीता विल्यम्स

NASA च्या सांगण्यानुसार, सर्व काही ठीक असेल तर स्टारलायनर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर हे हे दोन्ही अंतराळवीर सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील. तेथेही ते त्यांचे अभियान सुरू ठेवतील, स्टारलायनर आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी या काळात घेण्यात येईल.

या मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स झाल्या होत्या सहभागी

2012 साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळाच ट्रायलथॉन पूर्ण करणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या. यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर 1987 साली त्या यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. 1998 साली NASA द्वारे सुनिता यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर 2006 साली मिशन 14/15 मध्ये आणि 2012 साली त्या अंतराळ मोहिमांमध्ये सुनिता विल्यम्स यांचा महत्वाचा सहभाग होता.

RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.