टॅरिफच्या तणावात मोठी खळबळ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट पुतिन यांना फोन, नाटो देशाच्या..
Prime Minister Narendra Modi calls Vladimir Putin : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. आता फार्मा कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ लावण्यात आला. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी मोठे पाऊल उचलले.

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला. डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद करावी नाही तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचा धमक्या देत आहेत. भारतावर फक्त टॅरिफच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने भारताला अडकवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. भारतीय नागरिक H-1B व्हिसावर अमेरिकेत मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात. मात्र, भारताच्या समस्या वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख शुल्क आकारले. भारतीय फार्मा कंपन्यांसाठी अमेरिकन बाजारपेठ महत्वाची आहे. कोट्यावधीची उलाढाल भारतीय कंपन्या या अमेरिकेत करतात. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अमेरिकेत आयात होणाऱ्या फार्मा वस्तूंवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचा भारत आणि रशिया दोघांवरही मोठा परिणाम झाला आहे. नाटो प्रमुख मार्क रूट यांनी नुकताच अत्यंत मोठा दावा केलाय. रूट यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. हेच नाही तर त्यांनी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या रणनीतीवर थेट स्पष्टकरण पुतिन यांच्याकडे मागितले आहे. कारण युक्रेन आणि रशियातील युद्धाची थेट झळ भारताला बसत आहे.
नाटो प्रमुख म्हणाले की, अमेरिकेच्या शुल्कामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे. भारत आता व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना म्हटले की, मी तुम्हाला पाठिंबा देतो, पण तुम्ही मला युक्रेनवरील तुमची रणनीती समजावून सांगू शकाल का कारण आता अमेरिकेने लादलेल्या या 50 टक्के टॅरिफमुळे आम्ही प्रभावित होत आहोत. रूट यांनी केलेल्या दाव्यावर भारत किंवा रशियाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 50 टक्के कर लादला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा शांताचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. मात्र, त्यांनी यामुळे अनेक देशांना वेडीस धरल्याचे बघायला मिळाले.
