AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताने असं घुसून मारलय की…पाकिस्तानला त्यांचा हा एअर बेसच बंद करावा लागलाय

Operation Sindoor : युद्धज्वर चढलेल्या पाकिस्तानला भारताने असा धडा शिकवलाय की, पुढची काही वर्ष ते ही गोष्ट विसरणार नाहीत. भारताने पाकिस्तानात खोलवर घुसून असा हल्ला केलाय की, त्यांना त्यांचा एक एअरबेस बंद करावा लागला आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने NOTAM जारी केलय.

Operation Sindoor : भारताने असं घुसून मारलय की...पाकिस्तानला त्यांचा हा एअर बेसच बंद करावा लागलाय
Rahim Yar Khan airbaseImage Credit source: social media
| Updated on: May 12, 2025 | 9:28 AM
Share

युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानची भारताने चांगलीच जिरवली आहे. तीन दिवसांच्या सैन्य संघर्षात भारताने पाकिस्तानला चांगलच ठोकून काढलय. जम्मू-काश्मीरपासून गुजरात पर्यंतच्या सीमांमध्ये हवाई घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. पाकिस्तानने कुठलाही हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताचा प्रतिहल्ला इतका मोठा होता की, पाकिस्तान कधीच ही गोष्ट विसरणार नाही. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या लष्करी आणि हवाई इन्फ्रास्ट्रक्चरच नुकसान करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानात खोलवर सरगोदापर्यंत मिसाईल स्ट्राइक केला. भारताचा हा मिसाईल स्ट्राइक किती पावरफुल होता, त्याचे पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. भारताने पाकिस्तानातील अनेक एअर बेसेसवर हल्ला करुन त्यांची हवाई शक्तीच संपवून टाकली.

इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअर बेसची धावपट्टी पूर्णपणे उद्धवस्त करुन टाकली. IAF चा स्ट्राइक इतका पावरफुल होता की, पाकिस्तानला त्यांचा हा बेस आठवड्याभरासाठी बंद करावा लागला आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे. रहीम यार खान एअर बेसची एकमेव धावपट्टीच उखडून टाकली. पाकिस्तान नागरी हवाई प्राधिकरणाने नोटीस टू एअरमेन म्हणजे NOTAM जारी केलय. आठवड्याभरासाठी हे एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानी वेळेनुसार 10 मे च्या संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून 18 मे पर्यंत हा एअर बेस बंद राहणार आहे.

पाकिस्तानचा दक्षिणेकडचा हा महत्त्वाचा एअरबेस मानला जातो

पाकिस्तान नागरी हवाई प्राधिकरणाने नोटॅममध्ये फक्त वर्क इन प्रोगेस असल्याच म्हटलं आहे. त्यांनी त्यामागच कारण दिलेलं नाही. या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दक्षिणेकडचा हा महत्त्वाचा एअरबेस मानला जातो. भारताच्या मिसाइल हल्ल्यात धावपट्टीच मोठं नुकसान झाल्यामुळे तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, हेच त्यामागे कारण आहे. भारताच्या स्ट्राइकमध्ये रहीम यार खान एअर बेसच नुकसान झालय. इंडियन एअर फोर्सने रविवारी संध्याकाळी ऑपरेशन सिंदूरच्या ब्रीफिंगमध्ये उपग्रह फोटोंद्वारे ही गोष्ट स्पष्ट केली. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक एअरबेसेसच मोठ नुकसान झालय. त्याचे पुरावे सुद्धा आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....