India’s Most Wanted: 6 भाऊ, 4 बहिणी, 3 मुलं…, कुठपर्यंत पसरलं आहे डॉन दाऊद इब्राहिमचं कुटुंब?
India's Most Wanted: दोन भावांची हत्या... 67 व्या वर्षी दुसरं लग्न... 3 मुलं... 4 बहिणींचा व्यवसाय आणि... प्रचंड मोठं आहे डॉन दाऊद इब्राहिमचं कुटुंब... कुठपर्यंत पसरलं आहे घ्या जाणून...

India’s Most Wanted: 90 च्या दशकात मुंबईवर हल्ला करून दहशत माजवणारा भारताचा मोस्ट वॉन्टेड अपराधी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) गेल्या 30 वर्षांपासून बेपत्ता आहे… हल्ल्यानंतर त्याने भारत सोडलं आणि पाकिस्तानात जाऊन लपला. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानात त्याच्या कुटुंबासोबत राहत आहे. सांगायचं झालं तर, दाऊद जेवढा मोठी अपराधी आहे, तेवढंच मोठं त्याचं कुटुंब देखील आहे. तर जाणून घ्या दाऊदच्या पत्नी, भाऊ – बहिणी आणि त्यांच्या मुलांबद्दल…
67 व्या वर्षी डॉनचं दुसरं लग्न…
वयाच्या 67 व्या वर्षी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याने दुसरं लग्न केलं. पाकिस्तानने दाऊदला त्याचा जावई करुन घेतलं आहे… दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने एनआयएला दिलेल्या जबाबात खुलासा केला की, त्याने एका पाकिस्तानी पठाण महिलेसोबत दुसरं लग्न केलं.
दाऊदच्या दोन भावांचा मर्डर
1981 मध्ये दाऊदच्या मोठ्या भावाची मुंबईत पाठण टोळीने हत्या केली… याच घटनेनंतर दाऊद इब्राहिम एक डॉन म्हणून सर्वांच्या समोर आला… भारतातून पळून पाकिस्तानात स्थायिक झाल्यानंतर, दाऊदचा दुसरा भाऊ नूर कासकर याचं अपहरण करण्यात आलं. हे ऑपरेशन सरदार रहमान टोळीने केलं होतं. त्यांनी नूरच्या सुटकेच्या बदल्यात दाऊद इब्राहिमकडून 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खंडणी मागितली होती. पण दाऊद पैसे देऊ शकला नाही. परिणामी नूर याची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह कराची याठिकाणी दाऊदच्या घरी पाठवण्यात आला.
मुंबई, दुबई आणि कराचीमध्ये राहतात दाऊदचे भाऊ
मारल्या गेलेल्या दोन भावांव्यतिरिक्त, दाऊद इब्राहिमला आणखी तीन भाऊ आहेत. ज्यामध्ये अनीस इब्राहिम, इक्बाल कासकर, मुस्तकीम अली कासकर आणि जैतुन अंतुले यांचा समावेश आहे. हे चौघे मुंबई, कराची आणि दुबई याठिकाणी वेग-वेगळ्या भागात राहतात… मुंबईत राहणाऱ्या इक्बाल कासकरला काही काळापूर्वी पुन्हा अटक करण्यात आली होती. एका बिल्डरकडून पैसे उकळण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.
दाऊदच्या बहिणी आणि त्याचा व्यवसाय
दाऊद इब्राहिमला चार बहिणी होत्या: हसिना पारकर, सईदा पारकर, फरजाना तुंगेकर आणि मुमताज शेख… त्यामधील हसीना पारकर आणि फरजाना तुंगेकर यांचं निधन फार पूर्वी झालं. दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर, त्याची बहीण हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर त्याचा सर्व व्यवसाय सांभाळत होता. पण, दाऊदती अन्य गँगच्या लोकांसोबत वैर होतं. ज्याचा फटका मेहूणा इब्राहिम याला भोगावा लागला.
रिपोर्टनुसार, गवळी टोळीने इब्राहिमची हत्या केली. पतीच्या मृत्यूनंतर, हसिना पारकरने तिचा भाऊ दाऊदचा व्यवसाय ताब्यात घेतला. त्यानंतर तिला गुन्हेगारी जगातील “गॉडमदर” असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, नंतर हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
दाउदच्या पत्नी आणि मुलं…
दाऊद इब्राहिम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचं लग्न मेहजबीनशी झालं होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. मेहजबीनने प्रत्येक कठीण काळात पतीला साथ दिली. त्यांनी तीन मुलं होती. ज्यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहेत. डॉनची मोठी मुलगी, महरूक हिचं लग्न माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा मुलगा जुनैदशी झालं. या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
दुसरी मुलगी मेहरुन हिचं लग्न पाकिस्तानी – अमेरिकन आय्यूब यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या मुलाचं नाव मोईन आहे. त्याचं लग्न उद्योजकाची मुलगी सानिया हिच्यासोबत 2011 मध्ये झालं. या लग्नाचं आयोजन कराची याठिकाणी करण्यात आलं होतं.
