AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचा भारताला मोठा धक्का, ज्याची भीती तेच घडले, चीनबाबत अत्यंत मोठा निर्णय, लवकरच..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येत आहे. पुतिन यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दाैऱ्यानंतर रशियाने मोठा निर्णय घेतल्याचे बघायला मिळतंय.

रशियाचा भारताला मोठा धक्का, ज्याची भीती तेच घडले, चीनबाबत अत्यंत मोठा निर्णय, लवकरच..
Russian President Vladimir Putin
| Updated on: May 16, 2026 | 9:28 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसाच्या चीन दाैऱ्यावर होते. यादरम्यान अनेक बैठका झाल्या. काही मुद्द्यात चीन आणि अमेरिकेत एकमत झाले. गेल्या काही वर्षांपासून चीन आणि अमेरिकेचे संबंध तणावात होती. अखेर दोन्ही देश एकत्र येत त्यांनी चर्चा केली. चीनने स्पष्ट सांगितले की, आम्ही इराणकडून तेल खरेदी करणार आहोत, त्याला अमेरिका देखील सहमत झाली. मात्र, इराणला चीनने शस्त्र पुरवठा करू नये, याकरिता अमेरिका आग्रही राहिली. इराण हा चीनच्या मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. मात्र, इराणला अमेरिकेने शस्त्र पुरवठा बंद करावा, ही अमेरिकेची भूमिका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दाैऱ्यानंतर रशिया देखील कामाला लागला. रशियाचा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील लवकरच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दाैऱ्याची जवळपास सर्व तयारीही पूर्ण झाल्याची माहिती आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटले की, पुतिन यांचा चीन दाैरा जवळपास निश्चित आहे. दोन्ही देशांची तयारी पूर्ण झाली. चीन आणि रशिया यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून मजबूत होताना दिसत आहेत. रशियाबाबत अमेरिकेची भूमिका जगालाही माहिती आहे. रशियाकडून अमेरिकेच्या दबावानंतरही चीन तेल खरेदी करत आहे.

पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्तवेळा भेट झाली आहे. गेल्याच वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची शेवटची भेट झाली. युक्रेनसोबतच्या युद्धात चीनने रशियासोबत काही मोठे करार केले. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर तात्काळ पुतिन देखील चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. गेल्या वेळी पुतिन यांच्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनच्या दाैऱ्यावर होते.

पुतिन पुढच्या महिन्यातच चीनच्या दाैऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही. चीन आणि रशियाची वाढणारी मैत्री भारतावर नक्कीच परिणाम करणारी आहे. भारत आणि रशियातील मैत्री अनेक वर्षांची आहे. भारताच्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या काळात भारताची साथ रशियाने दिली. भारतही रशियाच्या वाईट काळात त्यांच्यासोबत उभा होता. मात्र, पुतिन यांचा हा दाैरा भारतासाठी चिंताजनक आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक