AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतली शपथ, पाहा कोणाकोणाचा समावेश

मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्यांना आज रात्री 8.50 वाजता (भारतीय वेळेनुसार) राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पदाची शपथ दिली. अन्य 13 सदस्यांनीही शपथ घेतली. युनूस यांच्याशिवाय अंतरिम सरकारमध्ये 16 सदस्य असतील.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतली शपथ, पाहा कोणाकोणाचा समावेश
| Updated on: Aug 08, 2024 | 9:50 PM
Share

शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर आज बांगलादेशमध्ये नवीन अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस आणि इतर सदस्यांना बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बांगलादेशात १७ वर्षांनंतर अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशवर लागोपाठ १५ वर्षे राज्य केले. पण हिंसक आंदोलनानंतर अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून जावे लागले.

आता डॉ. युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले आहे. अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी संघटनांनी केली होती. विद्यार्थ्यांनी सर्व राजकीय पक्षांना अल्टिमेटम दिला होता की, ते दुसऱ्या कुणालाही प्रमुख बनवणार नाहीत. दुपारी परदेशातून आले आणि पत्रकारासोबत बोलताना त्यांना अश्रू ही अनावर झाले. डॉ. युनूस यांच्यासोबत अंतरिम सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या इतर सल्लागारांची नावे निश्चित करण्यात आली.

कोणत्या नावांचा समावेश आहे

प्रोफेसर मुहम्मद युनूस – मुख्य सल्लागार सय्यदा रिझवाना हसन – BELA च्या मुख्य कार्यकारी फरीदा अख्तर – महिला हक्क कार्यकर्त्या आदिलुर रहमान खान – अधिकारचे संस्थापक हिफाजत-ए-इस्लामचे एएफएम खालिद हुसेन नायब-ए-अमीर आणि इस्लामिक मूव्हमेंट बांगलादेशचे सल्लागार नूरजहाँ बेगम – ग्रामीण दूरसंचार विश्वस्त शर्मीन मुर्शिद – स्वातंत्र्यसैनिक सुप्रदीप चकमा – अध्यक्ष सीएचटीडीबी

युनूस यांच्याशिवाय अन्य १३ सदस्यांनी घेतली शपथ

मोहम्मद युनूस व्यतिरिक्त, अंतरिम सरकारमध्ये सालेह उद्दीन अहमद, डॉ. आसिफ नजरुल, आदिलुर रहमान खान, हसन आरिफ, तौहीद हसन, सईदा रिझवाना हसन, फरीदा अख्तर, खालिद हुसेन, विद्यार्थी नेते नाहीद इस्लाम आणि आसिफ मेहमूद, शाखावत हुसेन, सरपोदीप यांचा समावेश आहे. चकमा, बिधान रंजन, नूरजहाँ बेगम, शर्मीन मुशीद आणि फारुख ए आझम यांचाही समावेश असेल.

यापैकी सर्पदीप चकमा, बिधान रंजन रॉय आणि फारुख ए आझम वगळता उर्वरित १३ सदस्यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. उर्वरित तीन सदस्यांना नंतर शपथ दिली जाईल.

अंतरिम सरकारचे सल्लागार नागरी समाज आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमधून निवडले जातील आणि त्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले. अंतरिम सरकारच्या आकाराविषयी विचारले असता, लष्करप्रमुख जनरल वॉकर-उझ-झमान म्हणाले की सुरुवातीला सुमारे 15 सदस्य असू शकतात. आणखी एक किंवा दोन लोक जोडले जाऊ शकतात.” अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार पंतप्रधानांच्या बरोबरीचे असतात आणि इतर सल्लागार मंत्र्यांच्या बरोबरीचे असतात.

नवीन सल्लागारांसाठी गाड्यांचा ताफा

मुख्य सल्लागार आणि इतर सल्लागारांसाठी 20 हून अधिक गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. खात्री मिळाल्यानंतर या गाड्या त्यांना बंगभवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला नेण्यासाठी त्यांच्या घरी पाठवल्या जातील. हे अंतरिम सरकार ठराविक कालावधीसाठी देशाचे नेतृत्व करेल आणि निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता हस्तांतरित करण्यासाठी निवडणुकांवर देखरेख करेल.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.