वॉशिंग्टन : भारतात कोरोनाच्या (Coronavirus in India) वाढत्या संसर्गाने परिस्थिती बिघडलीय. यावर जगाचं लक्ष लागलंय. जगातील अनेक देशांनी या संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात पुढे केलाय. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (26 एप्रिल) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात भारतात 3.52 लाख नागरिकांना कोरोना संसर्ग झालाय. याशिवाय 24 तासात कोरोनामुळे 2812 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 झालीय. तसेच एकूण 1 लाख 95 हजार 123 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या विषयावर वृत्तांकन केलंय. (International Media News on India Corona Virus Situation)