AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् एका आयफोनमुळे पायलटसह सर्व क्रू मेंबर्संनी गमावली नोकरी, इंडोनेशियाच्या विमानामधील विचित्र प्रकार

इंडोनेशियाच्या विमानामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे, एका आयफोनमुळे अनेकांवर आपली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे, जाणून घेऊयात असं नेमकं काय घडलं?

...अन् एका आयफोनमुळे पायलटसह सर्व क्रू मेंबर्संनी गमावली नोकरी, इंडोनेशियाच्या विमानामधील विचित्र प्रकार
| Updated on: Jun 28, 2025 | 8:07 PM
Share

एका प्रवाशाचा विमानात आयफोन हरवला, हा आयफोन कोणीतरी चोरल्याचा संशय या प्रवाशाला होता, त्यानंतर त्याने फाइंड माय आयफोन या फीचरने आपल्या मोबाईलाच शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन अशा ठिकाणी सापडलं, की त्यानंतर त्या विमानाच्या पायलटसह एअर होस्टेस आणि केबिन क्रू यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. मायकल तजेंडारा असं या प्रवाशाचं नाव आहे, मायकल 6 जून रोजी जकार्ताहून मेलबर्नला जाण्यासाठी निघाला होता. गरुड इंडोनेशिया फ्लाइटमधून त्याचा मोबाईल चोरी गेला, त्याने याबाबत सांगितलं की, त्याने आपला मोबाईल विमानाच्या सीटला असलेल्या पॉकेटमध्ये ठेवला होता. मात्र टेक ऑफ होताच त्याचं सीट चेंज करण्यात आलं, त्याला दुसरं सीट देण्यात आली.

मात्र तो आपल्या मोबाईल पहिल्या सीटवरच विसरला होता, थोड्याचवेळात त्याला आपल्या आय फोनची आठवण झाली. आयफोनची आठवण होताच, तो त्याने जिथे मोबाईल ठेवला होता, तिथे तो पोहोचला मात्र तोपर्यंत तेथून मोबाईल गायब झाला होता. त्यानंतर त्याने फाइंड माय आयफोन या फीचरने आपल्या मोबाईलाच शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन मेलबर्नच्या साउथबॅक प्रोमेनेडच्या जवळ आढळून आलं, त्याला आपल्या आयफोनचं लोकेश जिथे आढळलं तो परिसर मर्क्योर हॉटेलच्या आसपासच होता. या प्रवाशानं असा आरोप केला की या हॉटलमध्ये आधीपासूनच विमानाचे क्रू मेंबर होते.

त्यानंतर या व्यक्तीनं त्याच्यासोबत जे काही घडलं ते इन्स्टाग्रामवर शेअर केलं, सोबतच हा प्रश्न माझा एकट्याचा नाही तर संपूर्ण प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे तुम्ही ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा असं आवाहनही त्याने केलं, त्यानंतर त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, पोस्ट व्हायरल होताच विमान कंपनीकडून देखील या पोस्टची दखल घेण्यात आली, कंपनीनं या प्रकरणात त्यावेळी हजर असलेल्या पायलटसह सर्व केबिन क्रू मेंबरला नोकरीवरून काढून टाकलं आहे, याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.