मरायचं नसेल तर… इराण सरकारचं अधिकाऱ्यांना फर्मान, इस्रायलला रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय!
Iran And Israel War : इस्रायलला रोखण्यासाठी इराणे मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांना आता काही विशेष अपकरणं वापरावी लागणार आहेत.

Iran And Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलंच भडकलं आहे. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यांत दोन्ही देशांचे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. दरम्यान, इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. याच कारणामुळे शत्रू राष्ट्राचा सामना करण्यासाठी इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलला नेमकं कसं रोखलं जाऊ शकतं, हे इराणने शोधलं असून आपल्या अधिकाऱ्यांना मोठा आणि महत्त्वाचा आदेश दिला आहे.
नेमका आदेश काय?
मिळालेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलपासून होणाऱ्या हल्ल्यांपासून आपले संरक्षण व्हावे तसेच इराणच्या युद्धनीतीची संवेदनशील माहिती समोर येऊ नये यासाठी इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणी सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना मोठे फर्मान सोडले आहेच. या आदेशाअंतर्गत सरकारी अधिकारी, अधिकाऱ्यांची सुरक्षा टीम यांना पब्लिक कम्यूनिकेशन्स तसेच टेलिकम्यूनिकेशनचा उपयोग करण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. इराणच्या सायबर सुरक्षा विभागातर्फे या उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बंदी नेमकी का?
इस्रायलचा आतापर्यंतचा इतिहास पाहता इराणच्या सायबर सुरक्षा कमांडने हा आदेश दिला आहे. फार्स न्यूज एजन्सीनुसार इस्रायलतर्फे इराणी टेलिकम्यूनिकेशन आणि पब्लिक कम्यूनिकेशन यांचा उपयोग केला जाण्याची इराणला भीती आहे. इस्रायल मोबाईल फोनदेखील ट्रॅक करू शकतो. ट्रॅकिंगच्या मदतीने इस्रायल इराणवर पेजर अटॅक करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इराणने हा मोठा निर्णय घेतला आहे.
अँटी ट्रॅकिंग डिव्हाईस वापरण्याचा सल्ला
इराणच्या IRGC शी संबंधित असलेल्या फार्स न्यूज एजन्सीने अनेक दावे केले आहेत. इस्रायलने नुकतेच इराणच्या अणूवैज्ञानिकांना मारण्यासाठी हीच पद्धत वापरली. त्यामुळे इराणमधील संवेदनशील स्थानांवर मोबाईल फोन बंद करण्याचा आदेश इराणी अधिकाऱ्यांना देण्यात आलाय. तसेच जी उपकरणं अँटी ट्रॅकिंग आहेत, त्यांचाच अपयोग करण्याचा सल्ला या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात इराणचा हा निर्णय किती उपयोगी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
