AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुझ पुन्हा बंद, इराणचा सर्वात भयंकर डाव, अमेरिकेचं जहाज दिसताच…जगाला हादरवणारं सत्य अखेर बाहेर!

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. आमच्या शत्रूंच्या जहाजांना आम्ही टार्गेट करू, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा भडकणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

होर्मुझ पुन्हा बंद, इराणचा सर्वात भयंकर डाव, अमेरिकेचं जहाज दिसताच...जगाला हादरवणारं सत्य अखेर बाहेर!
iran and strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2026 | 4:39 PM
Share

Strait Of Hormuz : होर्मुझच्या खाडीत इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले आहे. इस्रायल आणि हेजबोला यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर इराणने होर्मुझची खाडी सुरू केली होती. परंतु जोपर्यं युद्धबंदीचा पूर्ण करार होत नाही, तोपर्यंत आमच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनीतील तसेच इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील, अशी भूमिका घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या या भूमिकेनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. इराणच्या या भूमिकेनंतर आता जगापुढे इंधन टंचाईचे नवे संकट निर्माण झाले असून इराणचा अमेरिकेसोबतचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराणने खरंच होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. असे असतानाच सोशल मीडियावर इराणच्या नौसेनेची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्पीपमुळे इराणच्या मनात नेमके काय चालेल आहे, याचा अंदाज लावला जातोय.

व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये नेमके काय आहे?

सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये इराणी नौसेनिक एक संदेश देताना दिसत आहेत. या संदेशात आमच्या सर्वोच्च नेत्याकडून जेव्हा आदेश येईल तेव्हाच आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू, असे एक नौसेनिक बोलताना दिसत आहे. “आम्ही इराणच्या नेव्ही चॅनेल-16 वरून बोलत आहोत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. एखाद्या मुर्खाच्या सांगण्यावरून नव्हे तर आमचे सर्वोच्च नेते इमाम मोजतबा खामेनेई यांच्या आदेशानंतरच ती खुली केली जाईल,” असे या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला येत आहे.

शत्रूंच्या जहाजांना टार्गेट करू

तसेच तुम्हाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचे असेल तर अगोदर इराणच्या नौसेनिकांकडून तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. आमचे शत्रू तसेच आमच्या शत्रूंशी संबंध असलेल्या जहाजांना टार्गेट करू, असा इशाराही दिलेला पाहायला मिळतो आहे.

अमेरिका नेमकं काय करणार?

दरम्यान, इराणच्या आयआरजीसी नौसेने आमच्या परवानगीशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवेश केल्यास हल्ला केला जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता इराणच्या या भूमिकेवर अमेरिका नेमके कोणते पाऊल उचलणार, युद्ध आणखी भडकणार का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...