
अमेरिका आणि इस्त्रायलकडून 28 फेब्रुवारी 2026 रोजी घातक हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर इराण एका मागून एक धक्कादायक हल्ले करत आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून इस्त्रायलच्या डिमोना या शहराकडे बघितले जायचे. तिथे अत्याधुनिक स्टिटम आहे, तिथे कोणताही देश हल्ला करू शकत नाही, अशी सुरक्षा असल्याचे सांगितले जात होते. तिथेच मोठा घातक हल्ला इराणकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली. यातील धक्कादायक बाब म्हणजे 400 पेक्षा अधिक लोक या घातक हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. आता इराणला कोणीतरी थांबवले पाहिजे, असे जगातून सांगितले जात आहे. यादरम्यानच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, देशावर सतत प्राणघातक हवाई हल्ले होत आहेत आणि या काळात इराणकडून संयमाची अपेक्षा करणे फक्त व्यर्थ आहे.
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इस्माईल बाकाई म्हणाले की, तेहरान प्रत्युत्तर देण्यापूर्वी हल्ले करणाऱ्या लोकांनी हल्ले थांबली पाहिजेत. मुळात म्हणजे इराणी सैन्याकडून अगोदरच इशारा देण्यात आला आहे की, इराणच्या वीज वितरण प्रणालीवर कोणताही हल्ला झाला तर या प्रदेशातील इस्त्रायल आणि अमेरिकन ऊर्दा संसाधनांना आम्ही टार्गेट करू.
आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ओमानचे बद्र अलबुसैदी यांच्यावर फोनवरून संवाद साधला. यामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलसोबतच्या युद्धाच्या स्थितीबद्दल चर्चा झाली. मुळात म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वीच ओमान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करत होता. मात्र, यामध्ये ओमानला यश मिळाले नाही आणि युद्ध पेटले.
इराणकडून या युद्धात आता थेट धमक्या दिल्या जात असल्याचे बघायला मिळत आहे. यासोबतच इराणकडून मोठे हल्ले देखील केले जात आहेत. अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता इराणला 48 तासाचा वेळ दिला. मात्र, इराणकडून या धमकीवर प्रतिउत्तर दिले आहे. होर्मुज खाडीतून इराण माघार घेणार नाही, हे स्पष्ट सांगितले. अनेक देशांचे जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत.