AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकाला मोठा दणका, होर्मुझबाबत इराणच्या भूमिकेने खळबळ, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना…

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. आता याच समुद्रधुनीबाबत इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेने इशारा दिल्यानंतर इराणची ही भूमिका समोर आली आहे.

अमेरिकाला मोठा दणका, होर्मुझबाबत इराणच्या भूमिकेने खळबळ, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना...
iran strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 22, 2026 | 6:41 PM
Share

Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सध्याच थांबण्याची शक्यता नाही. दिवसेंदिवस हे युद्ध आणखी भीषण होत चालले आहे. अमेरिकादेखील या युद्धात सहभागी असल्याने मोठा नरसंहार होताना पाहायला मिळतोय. अमेरिकेवर दबाव वाढावा म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. या समुद्रधुनीतून नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचा वैश्विक पुरवठ्याच्या तुलनेत एकूण 20 टक्के पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे भारतासह अनेक देशांवर उर्जासंकट निर्माण झाले आहे. इराणने हा जलमार्ग लवकरात लवकर खुला करावा यासाठी अमेरिकेकडून इराणवर दबाव टाकला जात आहे. असे असतानाच आता इराणे या जलमार्गाबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. हा जलमार्ग नेमका कोणासाठी खुला असेल, याबाबतची भूमिका इराणने स्पष्ट केली आहे.

इराणने नेमकी काय भूमिका घेतली?

इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संगटनेपुढे (आयएमओ) भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी इराणचे शत्रू वगळता इतर सर्व देशांची जहाजे आम्ही या मार्गाने जाऊ देऊ, असे आयएमओला सांगितले आहे. इराणची ही भूमिका समोर येण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खुली धमकी दिली होती. 48 तासांच्या आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास आम्ही त्यांच्या वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ले करू, असा रोखठोक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.

आम्ही आमचे सहकार्य यापुढेही चालूच ठेवू

अली मौसावी हे ब्रिटमध्ये इराणचे राजदूत राहिलेले आहेत. आम्ही सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच सागरी प्रवासाची सुरक्षा वृद्धींगत करण्यासाठी आयएमओ सोबत काम करण्यास तयार आहोत. आम्ही आमचे सहकार्य यापुढेही चालूच ठेवू. आमच्या शत्रूंची नसलेली आणि आमच्या सुरक्षा, संरक्षण व्यवस्थेशी समन्वय साधणारी जहाजे या मार्गाने जाऊ शकतात, असेही मौसावी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इराणची ही भूमिका म्हणजे थेट अमेरिकेला विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?