Israel Iran War : इराण – इस्रायलमध्ये किती भारतीय राहतात ? काय काम करतात ?
Indians in Iran and Israel: इस्रायल आणि इराणमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत आणि आकाशात धुराचे लोट पसरलेत आहेत. या हल्ल्यामुळे हजारो भारतीयांसह तेथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली आहे.इराण - इस्रायलमध्ये किती भारतीय राहतात, तुम्हाला माहीत आहे का ?

Israel Iran War : गेल्या 3 दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सुरू आहे आणि दोन्ही देश एकमेकांवर सतत क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. रविवारी संध्याकाळी इराणने पुन्हा इस्रायलच्या दिशेने अनेक मिसाइल्स डागली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने तेहरानमध्ये अनेक हवाई हल्ले (Air Strike) केले. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, निर्भ आकाश दिसत नाहीये, सगळीकडे फक्त धुराचे लोट पसरलेत. या हल्ल्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांसह हजारो भारतीयांची (Indians in Iran and Israel) रात्रीची झोप उडाली आहे.
याच दरम्यान, इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अनावश्यक प्रवास किंवा हालचाल टाळा, तसेच दूतावासाच्या संपर्कात रहा असे आवाहन भारतीय दूतावासाने लोकांना केलं आहे. यासाठी 24/7 हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले. भारतीय दूतावास या प्रदेशातील परिस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घाबरू नका, सावधगिरी बाळगा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
रात्रीची झोप उडाली, 3 दिवसांपासून कोणी झोपलचं नाही
सततच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी चिंतेत आहेत आणि त्यांची रात्रीची झोपही उडाली आहे. भीतीच्या वातावरणामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्यांना झोपच येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांपैकी एक इम्तिसाल मोहिदीन म्हणाला की, शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला, त्यानंतर मी जागा झालो आणि तळघराकडे पळत गेलो. तेव्हापासून आम्ही झोपूच शकलो नाहीये. ‘आम्ही अपार्टमेंटच्या तळघरात अडकलो आहोत आणि दररोज रात्री स्फोटांचे आवाज ऐकू येतात. फक्त 5 किलोमीटर अंतरावर एक स्फोट झाल्याचंही त्याने सांगितलं. बॉम्बस्फोटामुळे विद्यापीठाने वर्ग रद्द केले आहेत आणि आम्ही आमचे जीव वाचवण्यासाठी तळघरात लपलो आहोत.’ असं जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथील रहिवासी मोहिदीन म्हणाला.
या आपत्कालीन क्रमांकांवर मिळेल मदत
इराणमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाच्या सोशल मीडिया पेजेसचे नियमितपणे अनुसरण करावे जेणेकरून त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लेटेस्ट माहिती मिळू शकेल, असे ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. तसेच, गरज पडल्यास तात्काळ दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी आपत्कालीन क्रमांक (ergency number) eशेअर केले आहेत. दूतावासाने कॉलसाठी आपत्कालीन मोबाइल क्रमांक जारी केले आहेत, ते +98 9128109115, +98 9128109109 असे आहेत. त्याशिवाय यासोबतच, व्हाट्सॲपसाठी +98 9010144557, +98 9015993320 आणि +91 8086871709 हे क्रमांक जारी करण्यात आले आहेत. इतर प्रादेशिक संपर्क बंदर अब्बाससाठी+98 9177699036 आणि झाहेदानसाठी +98 9396356649 हे जारी करण्यात आले आहेत.
याशिवाय, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी क्रमांक देखील जारी केले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, दूतावासाला +972-54-7520711 आणि + +972-54-3278392, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचा किंवा cons1.telaviv@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता सर्व भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा अशी विनंती दूतावासाने केली आहे.
इराण – इस्रायलमध्ये किती भारतीय राहतात ?
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नोंदीनुसार, इराणमध्ये एकूण 10765 भारतीय नागरिक राहतात, त्यापैकी सुमारे 1500 भारतीय विद्यार्थी आहेत. इराणमध्ये 10320 अनिवासी भारतीय राहतात, तर 445 भारतीय वंशाचे नागरिक आहेत. बहुतेक भारतीय इराणमधील तेहरान आणि झाहेदान येथे राहतात. इराणमध्ये राहणारे बहुतेक भारतीय व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक जण व्यवसायांमध्येही गुंतलेले आहेत. इराणमध्ये अनेक काश्मिरी विद्यार्थी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या नोंदीनुसार, सुमारे 1.17 लाख भारतीय नागरिक इस्रायलमध्ये राहतात. त्यापैकी 32 हजार भारतीय आणि 85 हजार भारतीय वंशाचे लोक तिथे राहतात. यापैकी 12 हजार भारतीय ऑक्टोबर 2023 ते मार्च 2025 दरम्यान इस्रायलला गेले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिक्षण घेत आहेत.
