AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? इस्त्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा

Iran Israel War: इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे. इराणने त्यांच्या प्रॉक्सी फोर्सेसच्या मदतीने ट्रम्प यांची हत्या करण्याचा दोनदा प्रयत्न केला, असा दावा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला.

इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? इस्त्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा
Donald TrumpImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 16, 2025 | 7:51 AM
Share

Iran Israel War: इस्त्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहे. या दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा दावा केला आहे. इस्लामी शासक इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे. ट्रम्प यांनी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याचा निर्णय घेतल्यामुळे इराणकडून त्यांचा हत्येचा प्रयत्न झाला, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प एक निर्णायक नेते आहेत. त्यांनी कधी इतरांप्रमाणे कमकुवतपणे सौदेबाजी करण्याचा मार्ग निवडला नाही. गुप्तचर संस्थांचे म्हणणे अगदी बरोबर होते. इराण अण्वस्त्रे बनवण्याच्या जवळ पोहचला होता. इराणकडून युरेनियमपासून अण्वस्त्र बनवले जाणार होते. इराण महिन्याभरात अण्वस्त्र चाचणी करणार होता. एका वर्षात त्यांच्या हातात अण्वस्त्रे असते.

इराणवर गंभीर आरोप

इस्रायलाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला की, इराणने त्यांच्या प्रॉक्सी फोर्सेसच्या मदतीने ट्रम्प यांची हत्या करण्याचा दोनदा प्रयत्न केला. त्यांनी यासंदर्भात हिजबुल्लाह आणि हमासकडे लक्ष वेधले. डोनाल्ड ट्रम्प इराणचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यांच्याकडून अमेरिका मुर्दाबाद, अशा घोषणा दिल्या जातात. इराक आणि अफगाणिस्तानमध्ये इराणने अमेरिकेच्या विरोधात काम केले. बेरुतमधील २४१ अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूसाठी इराणच जबाबदार आहे. इराणच्या इशाऱ्यावरुनच वॉशिंग्टनमधील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि अमेरिकेचे झेंडे जाळण्यात आले.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इराणसारख्या राष्ट्राकडे अणू बॉम्ब असावा आणि तो तुमच्या शहरावर येऊन कोसळावा, अशी अपेक्षा आहे का? असा प्रश्न नेतन्याहू यांनी उपस्थित केला. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की, आम्ही स्वत:चेही संरक्षण करावे आणि जगाचीही मदत करावी. इराण ट्रम्प यांच्या हत्येबरोबर माझ्याही हत्येच्या तयारीत होता, असा दावाही त्यांनी केला. इराणाविरोधात इस्त्रायलने शुक्रवारीऑपरेशन रायजिंग लॉयन राबवले. त्यानंतर इराणकडूनही इस्त्रायलवर हल्ले करण्यात आले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.