AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामेनी नव्हे इराणचा ‘हा’ बडा नेता इस्रायलच्या निशाण्यावर, नेमकं कारण काय?

इस्रायलच्या निशाण्यावर खामेनी नसून दुसराच एक नेता आहे. या नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

खामेनी नव्हे इराणचा 'हा' बडा नेता इस्रायलच्या निशाण्यावर, नेमकं कारण काय?
abbas Araghchi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 21, 2025 | 5:41 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातु्ल्ला अली खामेनी माघार घ्यायला तयार नाहीत. अशातच आता महत्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार इस्रायलच्या निशाण्यावर खामेनी नसून दुसराच एक नेता आहे. या नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची हे इस्रायलच्या निशाण्यावर आहेत. इराणी गुप्तचर यंत्रणांनी तेहरानमध्ये अराक्ची यांच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. ही माहिती परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार मोहम्मद हुसेन रंजबरन यांनी दिली आहे. अराक्ची यांनी जिनेव्हा येथे युरोपीय देशांसोबत चर्चा केली होती. मात्र नंतर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वाढली. इराणी यंत्रणांनी वेळीच कारवाई केली आणि संभाव्य हल्ला टाळला. इस्रायलसाठी सय्यद अब्बास अराक्ची का धोकादायक आहेत ते जाणून घेऊयात.

अब्बास अराक्ची कोण आहेत?

अब्बास अराक्ची हे इराणमधील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते तीन दशकांहून अधिक काळ इराणी परराष्ट्र विभागाचा भाग आहेत. अमेरिका आणि युरोपसोबतच्या आण्विक पी 5+1 कराराबाबतच्या चर्चेत त्यांची भूमिका महत्वाची होती. अराक्ची सध्या युरोपीय देशांसोबत (यूके, फ्रान्स, जर्मनी) महत्त्वाच्या अणाव्यस्त चर्चेसाठी जिनेव्हा येथे पोहोचले आहेत.

अराक्ची यांना खामेनी यांचे राजनैतिक दूत मानले जाते. त्यामुळे ते इस्रायलसाठी धोकादायक ठरत आहेत. जर अराक्ची यांचे निधन झाले तर इराणचा राजनैतिक आवाज बंद होईल. अराक्ची यांची हत्या हा संपूर्ण इराणी लोकांवर आणि सरकारवर एक मानसिक हल्ला असता, ज्यामुळे इस्रायलला फायदा झाला असता, यामुळेच त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.

मी शहीद होण्यास तयार – अराक्ची

अराक्ची यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या देशाचा एक सैनिक आहे. जर माझ्या मृत्यूने मातृभूमीचे रक्षण होत असेल तर मी शहीद होण्यास तयार आहे. आम्ही युद्ध सुरू केले नाही, परंतु आम्ही मागे हटणार नाही. आता जगाला इस्रायलला थांबवावे लागेल.”

Follow Us
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती