Iran Israel War : युद्धात मोठं ट्विस्ट, पिछेहाट सुरू असतानाचा इराणला दोन बलाढ्य देशांचा थेट पाठिंबा, इस्रायला सर्वात मोठा धक्का
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे, यामुळे मध्यपूर्वेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे, इराणला आता दोन बलाढ्य देशांनी पाठिंबा दिला आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे, यामुळे मध्यपूर्वेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज फोनवर चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही जागतिक नेत्यांनी इराणला पाठिंबा देत इस्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. सोबतच अमेरिकेला देखील या दोन्ही देशांकडून इशारा देण्यात आला आहे. तातडीने मध्यपूर्वेमधील तणाव कमी व्हावा, चर्चेनं प्रश्न सोडवण्यात यावा अशी भूमिका रशिया आणि चीनने घेतल्याची माहिती समोर येत आहे.
एका रिपोर्टनुसार गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची फोनवर चर्चा झाली. इस्रायलकडून इराणवर करण्या आलेली कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं मत दोन्ही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. दोन्ही नेत्यांनी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
दोन्ही नेत्यांनी प्रश्न हे युद्धाच्या माध्यमातून नाही तर चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात यावेत असं म्हटलं आहे. इराणकडून सुरू असलेल्या अणू कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या चिंतेच समाधान सैन्य कारवाई नसून कुटनीतीच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात यावा यावर शी जिनपिंग आणि पुतीन यांनी जोर दिला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघावा असं रशिया आणि चीनने म्हटलं आहे. दुसरीकडे जिनपिंग यांनी रशियाकडून इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचं देखील कौतुक केलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पुढच्या आठवड्यात काही तरी मोठं घडणार असल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इराणला इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे. इराण चर्चेसाठी तयार होतं, त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये येण्याची तयारी देखील दर्शवली होती, मात्र आता त्याला खूप उशिर झाला आहे, असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
